विद्याधर पाटील पोलिस खात्यातून तर दामोदर शेळके शिक्षण खात्यातून सेवानिवृत्त

मारुती देवरे यांचाही मोदगी रेसिडन्सीने केला विशेष सत्कार 

नागोठणे : महेंद्र माने 

नागोठणे येथील मोदगी रेसिडन्सी सोसायटीतील रहिवासी अलिबाग तालुक्यातील वाघविरा येथील विद्याधर गजानन पाटील हे आपल्या पोलिस खात्यातून तसेच दामोदर तुकाराम शेळके हे शिक्षण खात्यातून 30 एप्रिल रोजी सेवा निवृत्त झाले आहेत. हे दोघे निवृत्त झाल्याचे समजताच मोदगी रेसिडन्सी सोसायटीतील रहिवाशांनी पाटील व शेळके यांचा तसेच भाजपा रायगड जिल्हा उपाध्यक्ष तसेच सोसायटीचे सदस्य मारुती देवरे यांचाही शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र कोकाटे,सचिव जगन कदम,मार्गदर्शक मुकुंद मोदगी यांच्यासह प्रभाकर म्हात्रे,सुधीर शिंदे,हिराजी धामणे,शैला पाटील,सविता कदम,नलिनी कुथे,प्रणीता पाटील तसेच सोसायटीतील रहिवासी उपस्थित होते.    

अलिबाग तालुक्यातील वाघविरा येथील मूळ रहिवासी विद्याधर पाटील हे आपल्या रायगड जिल्हा पोलिस खात्यात 1985 साली भरती झाले व 30 एप्रिल 2022 रोजी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदावरून सेवा निवृत्त झाले. सेवेत असताना अनेक पोलिस ठाण्यात विशेष चांगली सेवा केल्याबद्दल व निवृत्त झाल्याबद्दल अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या हस्ते पाटील यांना शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ तसेच सन्मान चिन्ह देऊन तसेच त्यांच्या पत्नी शैला पाटील यांना साडी व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच रोहा तालुक्यातील झोळांबे येथील मूळ रहिवासी दामोदर शेळके हे शिक्षण खात्यात 1982 रोजी प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झाले व खरोशी-पेण येथून 30 एप्रिल 22 रोजी मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत.त्यांचा खरोशी गावातील ग्रामस्थ व केंद्रातील शिक्षक- शिक्षिका यांनी शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ तसेच स्मूर्ती चिन्ह व त्यांच्या पत्नी पुष्पलता शेळके यांना साडी व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. त्याचप्रमाणे नागोठणे येथील मोदगी रेसिडन्सी सोसायटीतील रहिवाशांनी पाटील व शेळके यांचा तसेच सोसायटीसमोरील आंगरआळी रस्त्यालगतचा गटार व मोरीच्या कामासाठी स्थानिक आमदार रविशेठ पाटील यांच्या फंडातून रुपये 5 लाखाचा निधि विशेष प्रयत्न करून आणला व ते काम पूर्ण करून घेतल्याबद्दल सोसायटीचे सदस्य तसेच भाजपा रायगड जिल्हा उपाध्यक्ष मारुती देवरे यांचाही शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थितांचे आभार प्रभाकर म्हात्रे यांनी मानले.

Popular posts from this blog