रोह्यातील शिवाजी पाटील यांची गोवा टीमचे व्यवस्थापक म्हणून निवड
रोहा : समीर बामुगडे
हुबळी येथे दिनांक 27 व 29 मे 2022 रोजी होणाऱ्या साऊथ झोन इंटरस्टेट टूर्नामेंट स्पर्धेसाठी गोवा क्रिकेट असोसिएशन फॉर फिजिकल चॅलेंज गोवा जाणार आहे. या संघाचे व्यवस्थापक म्हणून ऑल स्पोर्ट्स असोसिएशन फॉर डिसेबल्ड चे अध्यक्ष तथा सहकार्य अपंग कल्याणकारी संस्था महाराष्ट्र सचिव शिवाजी पाटील व प्रशिक्षक म्हणून कुलाबा दिव्यांग क्रिडा असोसिएशन चे अध्यक्ष शशांक हिरवे यांची निवड करण्यात आली.
या संघात महाराष्ट्रातून रायगड जिल्ह्यातील कल्पेश टवले खालापूर, वैभव सकपाळ कर्जत, कल्पेश ठाकुर रोहा, कमलाकर कोळी पेण, नंदुरबार जिल्ह्यातील विजय वळवी, राजु वळवी, नवी मुंबई तील शेषनाथ विश्वकर्मा, मुंबईतील रूपेश पवार, परेश बाभानिया तर ठाण्यातील निरज सिंह यांची गोवा संघाचा कर्णधार म्हणुन निवड करण्यात आली आहे.