जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेत स्टेप आर्ट डान्स अकॅडमी प्रथम क्रमांकाचे मानकरी
नागोठणे : महेंद्र माने
रोहा तालुक्यातील वांगणी माजी सरपंच एकनाथ ठाकुर आयोजित संकल्प मित्र मंडळ यांच्या विद्यमाने शनिवार 21 मे रोजी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय भव्य नृत्य स्पर्धे स्टेप आर्ट डान्स अकॅडमी,उरण हे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. यावेळी कार्यक्रमाचे आयोजक एकनाथ ठाकुर,दळवी गुरुजी,लहू तेलंगे,शेखर ठाकुर,नरेश दळवी,कांचन ठाकुर,भाऊ तेलंगे,बाळा भिसे,तेजस ठाकुर,शुभम तेलंगे,चेतन दळवी,हेमंत चव्हाण यांच्यासह नृत्य प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेत 10 ग्रुप डान्स व व्ययक्तिक नृत्य स्पर्धेत 26 असे एकुण 36 स्पर्धकांनी भाग घेतलेल्या या स्पर्धेचे के.टी.शिर्के,प्रियांका जोशी व माने यांनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले असून, या गृपनृत्य स्पर्धेमध्ये - चंद्रशेखर ठाकूर व कांचन ठाकूर यांच्या सहकार्याने प्रथम क्रमांक- स्टेप आर्ट डान्स अकॅडमी,उरण यांना रोख रु. 5000/- व भव्यदिव्य चषक,व्दितीय क्रमांक- यश भगत ग्रुप यांना रोख 3001/- व भव्यदिव्य चषक, तृतीय क्रमांक- एम डान्स अकॅडमी यांना रोख रु. 1111/- व भव्यदिव्य चषक तसेच केदार डान्स अकॅडमी व त्रिशा आणि ग्रुप यांना नरेश दळवी यांच्या सहकार्याने उत्तेजनार्थ चषक तसेच व्ययक्तिक नृत्य स्पर्धात- तेजेश ठाकूर यांच्या सहकार्याने प्रथम क्रमांक- आर्या नारंगीकर हिला रोख रु. 2222/- व भव्यदिव्य चषक,व्दितीय क्रमांक- प्रियाली पाटील हिला रोख 1555/- व भव्यदिव्य चषक, तृतीय क्रमांक- वांशिता नाईक हिला रोख रु. 1111/- व भव्यदिव्य चषक तसेच आरती मोरे व आस्था दळवी यांना सौरभ तेलंगे यांच्या सहकार्याने उत्तेजनार्थ चषक देऊन गौरविण्यात आले.