कलाकारांना बक्षिसांपेक्षा टाळ्यांची दाद महत्वाची - आमदार अनिकेत तटकरे
नागोठणे : महेंद्र माने
रोहा तालुक्यातील वांगणी माजी सरपंच एकनाथ ठाकूर आयोजित संकल्प मित्र मंडळ यांच्या विद्यमाने शनिवार 21 मे रोजी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय भव्य नृत्य स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी आ. अनिकेत तटकरे यांनी कलाकारांना बक्षिसांपेक्षा टाळ्यांची दाद महत्वाची असल्याचे सांगितले. यावेळी रा.कॉ.जेष्ठ नेते भाई टके,दळवी गुरुजी,पो.नि.तानाजी नारनवर,संतोष कोळी, बाळासाहेब टके,सचिन कळसकर,विनायक गोळे,मयूर खैरे,एकनाथ ठाकुर,प्रमोद जांबेकर,लहू तेलंगे,शंकर ठाकुर,दिनेश घाग,शेखर ठाकुर,प्रकाश रेवाळे, कांचन ठाकूर,प्रशांत ठाकुर यांच्यासह विभागातील ग्रामस्थ व नृत्य प्रेमी उपस्थित होते.
आमदार निधीतून तयार करण्यात आलेल्या अंतर्गत रस्त्याचे व नृत्य स्पर्धेचे उद्घाटन तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामे करणार्या मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना आ.अनिकेत तटकरे यांनी सांगितले की, आमचे व नागोठणे विभागाचे नाते अतूट आहे; येथील विविध कामे झाली असून उरलेली कामेही लवकरच होणार असून ती करण्याची संधी आम्हाला मिळत आहे. वांगणी या छोट्याशा गावात एकनाथ ठाकुर यांच्या माध्यमातून संकल्प मित्र मंडळाने चांगले नियोजन करून कलाकारांना व्यासपीठ मिळवून दीले.कलाकारांना बक्षिसांपेक्षा टाळ्यांची दाद महत्वाची आहे. आपण आज पुढील वर्षी राज्य व त्यानंतर राष्ट्रस्तरीय नृत्य स्पर्धा ठेवण्याचा संकल्प करु या; जेणे करून कलाकारांना चांगली कला दाखविता येईल व प्रेक्षकांनाही त्याचा आनंद घेता येईल असे सांगून येथील मंदिरासाठी यावर्षीच खासदार निधीतून निधी दिला जाणार असल्याचे शेवटी आ.तटकरे यांनी सांगितले. आपल्या प्रास्ताविकेत एकनाथ ठाकूर यांनी तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाने मी समाजकार्य करीत असून,अनिकेत भाईंच्या माध्यमातून विविध निधी मार्फत गावाचा विकास झाला असल्याचे सांगून आता फक्त गावातील रस्ता डांबरीकरण व मरीआई मंदीर जिर्णोद्धारासाठी सहकार्य करण्याची विनंती शेवटी ठाकुर यांनी केली.शेखर ठाकुर यांनी खा.सुनील तटकरे,ना.अदिती तटकरे व आ.अनिकेत तटकरे यांनी आम्हाला दिलेल्या शब्दाप्रमाणे कामे पूर्ण केले असून असेच आशिर्वाद कायम राहून गावाचा विकास होऊ द्या असे सांगून वांगणी ते नागोठणे हा एमआयडीसी मार्गे जाणारा रस्ता करण्याची विनंती केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम तेलंगे व आभार चेतन दळवी यांनी मानले.