वरवठणे येथे श्री मारुती मंदिर जिर्णोध्दार व प्रतिष्ठापना
तीन दिवस चालणार विविध धार्मिक कार्यक्रम
नागोठणे : महेंद्र माने
रोहा तालुक्यातील वरवठणे येथील श्री मारुती मंदिराचे शनिवार 21 मे ते सोमवार 23 मे रोजी जिर्णोध्दार व प्रतिष्ठापना कार्यक्रम होणार आहे.
तीन दिवस चालणार्या या धार्मिक कार्यक्रमामध्ये शनिवार 21 मे रोजी सकाळी 7.00 वा. देवी देवतांचे मानपान, सकाळी 08.00 वा. आवाहीत देवता पूजन प्रारंभ व गणेश पूजन, दुपारी 12.00 वा. होम हवन प्रारंभ,सायंकाळी 05.00 वा. मुर्तीची मिरवणूक, रात्रौ 08.00 ते 10.00 महाप्रसाद,रात्रौ 10.00 वा. ग्रामस्थ मंडळ वरवठणे यांचे जागर – भजन तसेच लहान मुलांची गॅदरिंग तसेच रविवार 22 मे रोजी सकाळी 07.00 वा.आवाहीत देवता पूजन व श्री हनुमान मुर्ती कळश अभिषेक,सकाळी 11.00 वा.मुर्तीस प्राण प्रतिष्ठापना व कळशारोहन श्री.महादेव शिवाचार्य वाईकर महाराज यांच्या हस्ते व पुर्णाहुती, महाआरती, प्रसाद नंतर प्रवचन, दुपारी 12.00 वा.तिर्थप्रसाद, सायं.06.00 वा. मुंबई येथील जीवन विद्या मिशन यांचे हरिपाठ व प्रवचन, रात्रौ 10.00 वा. ग्रामस्थ मंडळ वरवठणे यांचे जागर - भजन, सोमवार 23 मे रोजी सकाळी 07.00 ते 12.00 वा. श्री हनुमान जप, दुपारी 02.00 ते 04.00 वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी 04.00 ते 06.00 वा. मान्यवर मंडळी व देणगी दात्यांचा विशेष सत्कार, सायं 06.00 ते 08.00 वा. वैभव महाराज खांडेकर तसेच नागोठणे, शिहू, ऐनघर पंचक्रोशीचे हरिपाठ,रात्री 08.00 ते 10.00 वा महाप्रसाद, रात्री 10.00 ते 12.00 वा. ह.भ.प. जागृतीताई खेरटकर यांचे किर्तन होणार असून हा धार्मिक कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता जीर्णोद्धार अध्यक्ष पांडुरंग म्हात्रे,उपाध्यक्ष नारायण म्हात्रे,सचिव दत्ताराम कर्जेकर,खजिनदार प्रभाकर म्हात्रे,वसंत म्हात्रे यांच्यासह जीर्णोद्धार कमिटीचे सर्व पदाधिकारी-सदस्य,सल्लागार तसेच ग्रामस्थ व महिला मंडळ अपार मेहनत घेतली असल्याची माहिती कमिटीचे उपाध्यक्ष नारायण म्हात्रे यांनी दिली.