रोहा तालुक्यातील निवी गावचे सुपुत्र अंकुश जाधव यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

रोहा : समीर बामुगडे

महाराष्ट्र शिक्षक पॅनल च्या वतीने राज्यातील गुणवंत शिक्षकांना देण्यात येणारा राज्यस्तरीय सेवा सन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार 2022 हा पुरस्कार रोहा तालुक्यातील निवी गावचे सुपुत्र सध्या शामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष श्री सतीश मोहन पाटील यांच्या न्यू इंग्लिश स्कूल कळंबोली विद्यालयात गेली १८ वर्षे कार्यरत असणारे शिक्षक अंकुश जाधव यांना प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार १५ मे २०२२ रोजी पुणे भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृह सिनेअभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड, शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारताना त्यांच्या सौभाग्यवती सौ. अवंतिका जाधव, मुले प्रथम प्रथमेश व सासुबाई श्रीमती शालिनी खामकर उपस्थित होत्या.

अंकुश जाधव यांनी शामल मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीच्या पनवेल तालुक्यातील कळंबोली येथील न्यू इंग्लिश स्कूल कळंबोली माध्यमिक शाळेत २००४ मध्ये आपल्या अध्यापन कार्याला सुरुवात केली. शैक्षणिक कार्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते प्रयत्नशील आहेत.

अंकुश जाधव यांना ६० % शारिरीक अपंगत्व आहे. या अपंगत्वावर मात करीत त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शिक्षक पॅनल तर्फे त्यांना सेवासन्मान राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२२ देण्यात आला आहे. त्यांना आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांमध्ये आदर्श शिक्षक, कवीभूषण, समाजभूषण, ज्ञानभूषण शिक्षक रत्न, वृक्षमित्र आदी पुरस्कारांचा समावेश आहे. महाराष्ट्र शिक्षक पॅनलचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांच्या गुणगौरवात मानाचा शिरपेच चढवतो. या पुरस्कारासाठी महाराष्ट्र शिक्षक पॅनल रायगड विभाग प्रमुख श्री सुरेश शिंदे सर यांनी त्यांची निवड केली. आज त्यांना प्राप्त झालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर शुभेच्छांचा, अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, कौतुक होत आहे.

Popular posts from this blog