युनिफाईट राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला प्रथम क्रमांकाचे अजिंक्य पद
पनवेल : प्रतिनिधी
युनिफाईट नॅशनल चॅम्पियन शिप 2022 चे आयोजन युनिफाईट इंडियन असोसिएशन हिमाचल प्रदेश, पालमपूर येथे दिनांक 21 आणि 22 मे 2022 आयोजित करण्यात आले होते. युनिफाईट वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र यांना राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे अजिंक्य पद प्राप्त झाले. या स्पर्धेत महाराष्ट्र, आसाम, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, तामिळनाडू, पंजाब, हरियाणा आणि दिल्ली या राज्यातुन 359 पेक्षा जास्त खेळाडूनी भाग घेतला.
सुवर्णपदक विजेते : वेदांत कायंदेकर, प्रधुम्हय म्हात्रे, रोहित भोसले, वरद केणी, समिक्षा कायंदेकर, कृपाश्री शेट्टी, सई शिंदे, यश जोशी, मधुरा गायकवाड, अलोक निर्मल, आरव शेट्टी,शिवप्रेम जुवले, प्रणब कांबळे, नाविन्य साळगावकर, साहिल कुलटे, वरद कालंगे, रोहित मालविया, सुजय वेंगुर्लेकर, यश जोशी, आणि रितुल म्हात्रे, रजत पदक विजेते : रुद्रा चौधरी, दिपेश जाधव, तेजस मोहिते, कृष्णा पांडे, श्रेयस म्हात्रे आणि यश पाटील, कांस्य पदक विजेते : श्रुधी सुपे, ध्रुव वनकर यासर्व खेळाडूंची निवड रशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे. या सर्व खेळाडूंचा सत्कार युनिफाईट वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र याचे सचिव आणि मार्गदर्शक डॉ मंदार पनवेलकर, अध्यक्ष श्री संतोष खंदारे, सुनील वडके, रविंद्र म्हात्रे, सागर कोळी , निलेश भोसले,प्रशांत गांगर्डे यांच्या हस्ते करण्यात आला.