राष्ट्रीय महामार्गावर अपघात; स्कॉर्पीओची आयशर टेम्पोला जोरदार धडक
एकाचे निधन;टेम्पो चालक तसेच जिपमधील चार बालकांसह आठ जण जखमी
नागोठणे : महेंद्र माने
नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निडी गावाच्या पुलाजवळ गुरुवार 19 मे रोजी दुपारच्या दरम्यान स्कॉर्पीओ जीपने आयशर टेम्पोला मागून मारलेल्या धडकेत एकाचे उपचारा दरम्यान निधन झाले असून, टेम्पो चालक तसेच चार बालकांसह आठ जण जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार 19 मे रोजी यग्नेश दिलीपभाई पटेल हा आपल्या ताब्यातील स्कॉर्पीओ जिप गाडी क्र. GJ 01 HW 1811 घेऊन मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून गोवा बाजूकडे जात असता सदरील गाडी दुपारी 2.30 वाजण्याच्या दरम्यान नागोठणे जवळील निडीपुलाजवळ अतिवेगात आली असता चालकाला झोपेची डुलकी लागल्याने त्याचा गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी रस्त्याच्या बाजूला उभा असलेला आयशर टेम्पो क्र.MH 06 BW 1414 याचे पाठीमागील बाजूस उभा असलेला आयशर टेम्पो चालक राकेश पाटील यास ठोकर मारुन आयशर टेम्पोला पाठीमागील बाजुस जोरदार धडक मारली. अतिवेगात येऊन धडक मारल्याने जीपचा पुढील भाग टेम्पोच्या मागील बाजूस घुसल्याने झालेल्या अपघातात आयशर टेम्पो चालक 1)राकेश लक्ष्मण पाटील रा. ईरवाडी ता. पेण तसेच जिपमधील गुजरात राज्यातील 2)कार्तिक पंकजभाई पटेल, वय 28 वर्षे , रा.कोटेश्वर अहमदाबाद,3) मानसी कार्तीक पटेल, वय 26 वर्षे, 4) फोराम यग्नेश पटेल, वय 34 वर्षे,रा. बोपाळ, 5)जित यग्नेश पटेल वय 01 वर्षे, रा. बोपाळ,6) शिवाय कार्तिक पटेल, वय 05 वर्षे रा कोटेश्वर,7)न्याशा कार्तिक पटेल वय 04 वर्षे रा.कोटेश्वर, 8)यग्नेश दिलीपभाई पटेल, वय 33 वर्षे , रा.भोपाळ, 9)धेय यग्नेश पटेल वय 04 वर्षे, रा.भोपाळ यांना लहान मोठ्या प्रमाणात जखमी झाले असून सर्व जखमींना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथोमोपचार करून पुढील उपचारासाठी मुंबईकडे रवाना करण्यात आले. यामधील कार्तिक पटेल याचे उपचारा दरम्यान निधन झाले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सचिन भोईर करीत आहेत.