एकता महिला ग्रामसंघ जोहे व मुंबई पशु वैद्यकीय महाविद्यालय मुंबई यांच्या मार्फत प्रशिक्षणाचे आयोजन
पेण : शेखर सावंत
जोहे येथे एकता महिला ग्रामसंघाच्या वतीने व मुंबई पशु वैद्यकीय महाविद्यालय मुंबई यांच्या सहकार्याने महिला बचत गटातील महिलांना दुग्धजन्य पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले त्यामध्ये पशु वैद्यकीय तज्ञ डॉक्टर विवेक शुक्ला यांनी महिलांना पनीर, खवा, लस्सी, ताक, दही कसे बनवावे याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच या पदार्थांची मार्केटिंग कशी करावी त्याबद्दल देखील मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाचे आयोजन हे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोत्ती अभियानाच्या प्रभाग समन्वयक प्रीती पाटील यांनी केले. या प्रशिक्षणासाठी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रशिक्षणासाठी मुंबई पशु वैद्यकीय महाविद्यालय मधील डॉ. रवींद्र चौधरी, डॉक्टर मनीष सावंत, डॉक्टर विवेक शुक्ला, डॉक्टर अर्जुन कोडापे उपस्थित होते तसेच आर, डी. सी. सी. बँक जोहे शाखेचे व्यवस्थापक नरेंद्र भोईर उपस्थित होते. तसेच बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.