रोहा तालुक्यात राजकीय भूकंप होणार!
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार म्हात्रे आणि लक्ष्मण महाले शेकाप मध्ये प्रवेश करणार
रोहा : प्रतिनिधी
रोहा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनमानी व हुकूमशाहीला कंटाळून राष्ट्रवादीचे अलिबाग मुरुड रोहा मतदारसंघ अध्यक्ष नंदकुमार म्हात्रे तसेच रोहा तालुका ओबीसी सेल व माजी पं. स. सभापती लक्ष्मण महाले हे मेढा येथे होणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यक्रमांत राष्ट्रवादी पदाचा राजीनामा देऊनच पक्ष प्रवेश करणार असल्याचे त्यांनी हे स्वतः जाहीर केले आहे.
गेली अनेक वर्षे पक्षाशी प्रामाणिक पणे काम करुन पक्षवाढीसाठी सचोटीने प्रयत्न केलेला असतांना तसेच पक्षाच्या बाजूने एक निष्ठ काम करुणही अनेकदा पक्षश्रेष्ठींनी आमच्यासाठी झुकते माप दिले तरीही पक्षीय वातावरण मलीन करुन न घेता अपमान पचवून यशाकडेच वाटचाल केलेली असतांना आता आमच्यावर जर का तेच तेच शरकल्य उमटताना दिसत असेल तर मात्र खपून घेतला जाणार नाही अशा भाषेत म्हात्रे व महाले म्हणत होते.पुढे म्हणतात की आम्ही स्पष्ट बोलणारे आम्हाला आतल्या गाठी कधी कळाल्याच नाही.पक्षाला आज कान चावणारे गुलू गुलू बोलणारे शेंडे आवडत आहेत अशा शब्दात चमचे कार्यकर्त्यांवर टीका देखील केली.निष्ठाई व मेहनतीने पक्षासाठी राबणारी मंडळी आज पक्षाला नकोशी झाली असल्याचे चित्र दिसते आहे म्हणून आम्ही व आमचे सहकारी असे विभागातील व रोहा तालुक्यातील आमच्या विचाराशी सहमत असलेले असंख्य कार्यकर्ते यांना आमची घुसमट होणारी मांडूनच त्यांनीही आम्ही घेतलेल्या निर्णयावर सहमती दर्शवली असून उद्याच्या कार्यक्रमात जाहीर प्रवेश शेतकरी कामगार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस मा.आ.जयंतभाई व पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत केला जाईल असे नंदकुमार म्हात्रे यांनी सांगितले.