महिलांना सन्मानाची वागणूक मिळावी हाच महिला सुरक्षा संघटनेचा उद्देश - दिपीकाताई चिपळूणकर

महिला सुरक्षा संघटनेच्या वरसे विभाग प्रमुख पदावर सरिता पालांडे यांची निवड 

रोहा : समीर बामुगडे

रोहा तालुक्यातील वरसे येथे महिला सुरक्षा संघटनेचा कार्यक्रम संपन्न झाला.

याप्रसंगी महिला सुरक्षा संघटना कोकण विभाग प्रमुख सौ. दिपीकाताई चिपळूणकर व रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद बाबर यांचा सत्कार संघटनेच्या वतीने करण्यात आला. यावेळी महिला सुरक्षा संघटनेच्या वरसे विभाग प्रमुख सरिता पालांडे, वरसे विभाग सचिव नम्रता विचारे, वरसे विभाग उपाध्यक्ष पुनम सुर्वे यांची निवड झाली. प्रियेशा पाटील रुपाली इंदुलकर यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्या यावेळी उपस्थित होत्या.

महिला दक्षता समिती रोहा पोलीस स्टेशन सोबत असून महिलांना सातत्याने कायदेशीर अडचणी दूर करण्यासाठी मदत करत आहे. तसेच सामाजिक कार्यक्रमात महिला नेहमीच सहभागी असतात. भारत सरकार निती आयोगाद्वारे महिला सुरक्षा संघटना मान्यताप्राप्त असून अत्याचारापासून महिलांना संरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न आहे. महिला सुरक्षित राहिल्या पाहिजेत समाजात समान हक्क मिळून महिलांना सन्मानाची वागणूक मिळावी हाच महिला सुरक्षा संघटनेचा उद्देश आहे असे दिपाकाताई चिपळुणकर यांनी आपल्या भाषणात सांगितले.

याप्रसंगी महिला सुरक्षा संघटना रोहा तालुका कार्याध्यक्ष अदिती शिंदे, सरपंच नरेश पाटील, अशोक निकम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Popular posts from this blog