नागोठणे माझे माहेर घर ; विकासनिधि कमी पडू देणार नाही - आ. रविशेठ पाटील
विकास कामांचा लोकार्पण व भूमिपूजनाच्या वेळी केले प्रतिपादन
नागोठणे : महेंद्र माने
नागोठणे शहर माझे माहेर घर असून त्याच्या विकासासाठी निधि कमी पडू देणार नसल्याचे प्रतिपादन आ. रविशेठ पाटील यांनी येथील ग्रामपंचायत आयोजित स्थानिक आमदार विकास कार्यक्रम अंतर्गत विविध विकास कामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्याच्या वेळी केले. गुरुवार 21 एप्रिल रोजी सायंकाळी 5.00 वाजता आ. रविशेठ पाटील यांचे शुभहस्त तसेच रा.जि.प. सदस्य किशोर जैन यांच्या अध्यक्षेखाली व पं.स. सदस्य बिलाल कुरेशी यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला सरपंच डॉ.मिलिंद धात्रक,उपसरपंच मोहन नागोठणेकर,ग्रा.प.सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे,भाजपाचे मारुती देवरे,श्रेया कुंटे,आनंद लाड,सचिन मोदी,सिराज पानसरे,सुभाष पाटील,राजेंद्र लवटे,तीरथ पोलसानी,विजय शहासने,अजय दळवी,सत्यजित रावकर,प्रणव रावकर यांच्यासह शिवसेना,भाजप कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.स्थानिक आमदार विकास कार्यक्रम अंतर्गत विविध विकास कामांमध्ये 1) मशिदी शेजारील नाला,2) खर्चाचा लक्ष बँक ऑफ इंडिया समोरील रस्ता, 3)खर्चाचा आंगरआळी क्रॉस ड्रेनचे लोकार्पण सोहळा तसेच 1) डॉ. कुंटे ते शैलेंद्र देशपांडे घर रस्तावर पेव्हर बसविणे 2) श्री. दत्त मंदिर ते चांदणी प्लोअर मिल रस्त्यावर पेव्हर बसविणे ,3) जोगेश्वरी नगर नाळयाला संरक्षण भिंत बांधणे, 4) हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नगर अंतर्गत रस्ता तयार करणे,5) आझाद मोहल्ला रस्ता तयार करणे ,6) खुमाचा नाका ते मशीद रस्ता तयार करणे या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.
लोकार्पण व भूमिपूजना नंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना आ. रविशेठ पाटील यांनी सांगितले की, मला लोकांनी आमदार म्हणून मनापासून स्वीकारले आहे. विकास कामे करतांना मी कधीही राजकारण करीत नाही.राजकारण विकासाच्या दृष्टीने बदलता ठेवू या. नागोठणे हे माझे माहेर घर असल्याने शहराच्या विकासासाठी निधि कमी पडू देणार नाही.रस्ता,पाणी,गटारे,आरोग्य याबाबतचे प्रश्न सुटले पाहिजेत.त्यासाठी तुम्ही फक्त कामे सुचवा ती निश्चितच करण्यात येतील. जेणे करून पुढील 2.5 वर्षात एकही काम शिल्लक राहणार नसल्याचे सांगून,आपण सर्वांनी कोणतेही मतभेद न करता एक दिलाने कामे करा;त्याचा भविष्यात आपल्याला फायदा निश्चितच होणार असल्याचे शेवटी आ.रविशेठ पाटील यांनी सांगितले.
माझ्यासाठी खुर्ची पेक्षा विकास महत्वाचा - किशोर जैन
आम्ही राजकारण मनात ठेऊन विकास कामे केली नसल्याने जनतेने आम्हाला स्वीकारले.विधान सभेच्या निवडणुकीच्यावेळी भाजपा-शिवसेना युती झाली व माझा या मतदार संघावर दावा असतानाही मी रविशेठ पाटील यांच्या उमेदवारीला होकार दिला व त्यांना भरघोस मताने निवडून आणले. मतदार संघात दावा वैगरे काही नसत ठरविणारे वरिष्ठ आहेत.दाव्या पेक्षा निधि आणा व गावाला द्या भरभरून आम्ही ते स्वीकारणार असल्याचे सांगून राजकारण न करता विकास कामे करीत आहोत. काही लोक कामे कमी व जाहिरात बाजी जास्त करतात पण माझ्यासाठी खुर्ची पेक्षा विकास महत्वाचा असल्याने आम्ही जाहिरात बाजी न करता कामे जास्त करत असल्याचे सांगून आदित्य ठाकरे यांनी चार कोटी अठरा लाख रूपयांचा भरघोस विकास निधि दिला असून त्या पैकी दोन कोटी नागोठणे शहारासाठी असल्याचे शेवटी किशोर जैन यांनी संगितले.
यावेळी भाजपाचे मारुती देवरे यांनीही आपले विचार मांडले. उपस्थितांचे आभार आनंद लाड यांनी केले.