ऐतिहासिक मोटेचा तलाव झाला चकाचक ; नागरिकांनी मानले सरपंचांचे आभार

नागोठणे : महेंद्र माने 

शहराचे वैभव असलेले व एकेकाळी संपूर्ण गावाला पाणीपुरवठा करणार्‍या मोटेच्या ऐतिहासिक तलावात बेजबाबदार नागरिक घरातील कचरा, दारूच्या रिकाम्या बाटल्या बेधडकपणे फेकत असल्याने तलावात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होती. तसेच या घाणीच्या दुर्गंधीचा त्रास शेजारच्या नागरिकांना होत असल्याने बेजबाबदार नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी जागृत व सुज्ञ नागरिक करण्यात आली होती. याबाबतची बातमी वृत्तपत्रात प्रसिद्ध होताच सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी त्याची तातडीने दखल घेऊन खडक आळीतील ज्वाला ग्रुपच्या मदतीने तलाव स्वच्छ केला. तलावातील घाणीच्या दुर्गंधीतून मुक्तता झाल्याने परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त  करून सरपंच डॉ. धात्रक यांचे आभार मानले.    

पाणी दुष्काळाच्या वेळी संपूर्ण गावाला जिवदान देणारे व गावाचे वैभव असलेले मोटेच्या तलावात आजू-बाजुचे ज्यांना या तलावाचे महत्व माहीत नाही असे बेजबाबदार लोक घरातील कचरा, दारूच्या रिकाम्या बाटल्या बेधडकपणे तलावात फेकत होते. त्यामुळे तलावात भरपूर असलेले पाणी खराब होऊन त्यावर शेवाळ आली होती. या तलावात प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून टाकलेली घाण कुजून येणार्‍या दुर्गंधीचा त्रास तलावाच्या बाजूने जाणारे येणारे तसेच शेजारी राहणार्‍या नागरिकांना तसेच आजू-बाजूच्या महिला कपडे धुण्यासाठी तलावावर आल्यावर त्यांनाही दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत होता. या बाबतच्या बातम्या प्रसिद्ध होताच सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी त्याची तातडीने दखल घेऊन खडक आळीतील ज्वाला ग्रुपचे स राजेश पिंपळे, नितिन राऊत, सुरेश जोशी,नीलेश भोपी,संतोष जोशी, पिंटू रटाटे,सचिन ठोंबरे,पांडू म्हसकर  यांच्यासह ग्रुपच्या सदस्यांनी तलावातील घाण काढून तलाव स्वच्छ करून कचरा मुक्त केला. तलावातील घाणीच्या दुर्गंधीतून मुक्तता झाल्याने परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांना धन्यवाद देत आहेत.

Popular posts from this blog