वरचीवाडी (विळे) येथे कराटे प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन
पाटणूस/माणगांव : आरती म्हामुणकर
वरचीवाडी (विळे) बाजारतळ या ठिकाणी जपान कराटे असोसिएशन ऑफ इंडीया, महाराष्ट्र ,शाखा रायगड यांचे शोतोकाॅन कराटे प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन परशुराम कोदे सरपंच ग्रामपंचायत वरचीवाडी यांचे शुभहस्ते करण्यात आले. यावेळी जपान कराटे असोसिएशनचे रायगड प्रमुख मुख्य प्रशिक्षक, 4डॅन ब्लॅक बेल्ट जपान व इंडिया प्राप्त इंटरनॅशनल रेफ्री, एक्झामिनर अमर यादव सर यांनी स्वसंरक्षण तसेच निरोगी शरीरासाठी कराटेचे महत्त्व उपस्थित मान्यवरांना पटवून दिले. त्याचबरोबर प्रशिक्षणार्थी यांचे प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. डि.जी.कोदे यांनी उपस्थित पालक व विद्यार्थी यांनी कराटे प्रशिक्षणाचे महत्त्व व गरज लक्षात घेऊन अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश करावा असे आवाहन केले. सदर उद्घाटन समारंभास वरचीवाडी ग्रामपंचायतचे सरपंच परशुराम कोदे, उपसरपंच मालुसरे ताई, ग्रामपंचायत सदस्य, गाव कमिटीचे अध्यक्ष देविदास सुतार, महेश ताम्हणकर सर,ग्रामस्थ,शिक्षक वर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रशिक्षक अमर यादव सरांनी कराटे प्रशिक्षण वर्गाचे नियम वेळापत्रक सांगून आठवड्यातून मंगळवार व शुक्रवार हे दोन दिवस वरचीवाडी बाजारतळ मैदानावर सायंकाळी पाच वाजता प्रशिक्षणासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. सदर उद्घाटन समारंभ व प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यासाठी ग्रामपंचायत वरचीवाडी यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले त्याबद्दल जपान कराटे असोसिएशनच्या वतीने समर्थ यादव यांनी ग्रामपंचायत व गाव कमिटीचे आभार व्यक्त केले.