महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते मिलिंद जोशी यांचा सत्कार
रोहा : सदानंद तांडेल
महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा शिक्षकेतर संघटनेचे महासचिव मिलिंद जोशी हे एक सामाजिक जाण असणारे आदरणीय व्यक्तिमत्व! ते सुधागड एज्युकेशन सोसायटी पाली चे प्रशासकीय अधिकारी म्हणूनही काम करीत आहेत. ते नेहमीच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात आघाडीवर असतात. कोविडच्या महाभयंकर काळात उपचाराकरिता प्राणवायू इतकेच महत्व रक्ताला आले होते. ही भीषणता लक्षात घेऊन अनेक लोकं घरातच अडकून पडली होती. अशा परिस्थितीत मिलिंद जोशी यांनी सामाजिक भान जपणाऱ्या व माणुसकी असणाऱ्या स्वयंसेवी संघटनांना हाताशी धरून रक्त संचालन करण्याचे उत्कृष्ट कार्य केले.
त्यांच्या यशाची यशो कमान एवढी उंचावली की त्यांच्या या उपक्रमाची नोंद जागतिक स्तरावर घेण्यात आली. त्यांच्या या उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल श्रीमान भगतसिंग कोश्यारी यांच्या शुभहस्ते राजभवन येथे झालेल्या भव्य व दिव्य कार्यक्रमात मिलिंद जोशी यांचा सत्कार व गौरव करण्यात आला. मिलिंद जोशी हे सुधागड एज्युकेशन सोसायटी पाली या संस्थेत प्रशासकीय अधिकारी म्हणून उत्कृष्ट काम करत आहेत.
त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.