ग्रुप ग्राम पंचायत निडी तर्फे अष्टमी आणि कंझुमर ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत आरोग्य शिबीर
रोहा : प्रतिनिधी
ग्रुप ग्राम पंचायत निडी तर्फे अष्टमी आणि कंझुमर ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे आमदार शअनिकेत भाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत आरोग्य शिबीर व मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात चष्मे वाटप आणि मोफत औषध वाटप प्राथमिक शाळा निडी तर्फे अष्टमी येथे संपन्न झाले.
मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन रोहा तहसीलदार कविता जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ग्रुप ग्राम पंचायत निडी तर्फे अष्टमी चे उप सरपंच श्री. उत्तम नाईक, सदस्य श्री. अनंत चौलक, श्री. अनिल वाटवे, सौ. शीतल चोरगे, सौ. तेजल जोशी, सौ. अक्षदा डोळकर, सौ. नयनीता डोळकर, ग्रामस्थ कमिटी सचिव श्री. जगदीश पाटील, संतोष चोरगे, नवनीत डोळकर, अरुणेश चोरगे, आरोग्य तपासणी शिबीर चे सर्व डॉक्टर व त्यांचे सर्व सहकारी, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका व ग्रामस्थ, ग्रामस्थ महिला यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला.