श्री. अनंत थिटे यांचा १ मे रोजी वाढदिवस
सामाजिक कार्यांत अग्रेसर असलेले रोहा तालुक्यातील युवक अनंत थिटे
रोहा : समीर बामुगडे
राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रांत सक्रीयपणे कार्यरत असलेले खांब विभागातील बाहे गावचे रहिवासी श्री. अनंत थिटे यांचा वाढदिवस रविवार दि. १ मे रोजी साजरा होणार आहे.
श्री. अनंत थिटे हे रोहा तालुका कुणबी युवक अध्यक्ष, ओबीसी संघर्ष समिती रोहा तालुका उपाध्यक्ष, कृपासिंधू गृह निर्माण सहकारी संस्था अध्यक्ष आदी विविध पदांवर कार्यरत असून सर्वसामान्यांचे सामाजिक प्रश्न सोडविण्याकरिता त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. सर्वसामान्यांच्या आरोग्यविषयक समस्या सोडविण्याबरोबरच त्यांनी अनेक आरोग्य शिबीरेही आयोजित केली. क्रिडा क्षेत्रात देखील त्यांचा सक्रीयपणे सहभाग असून त्यांनी रोहा तालुका कुणबी चषक स्पर्धा आयोजित केली होती. त्यामध्ये ८० संघांनी सहभाग घेतला होता.