बोरिवली ठाणे भिरा एस. टी. बस सुरू

पाटणूस/माणगांव : आरती म्हामुणकर

माणगांव तालुक्यातील पाटणूस, भिरा, विळे, रवाळजे व ज्या गावांना या एस. टी. बसचा फायदा होतो अशा सर्व नागरिकांना खूष खबर म्हणजे दि. 26 एप्रिल 2022 पासून बोरिवली ठाणे भिरा एस. टी. बस. नियमित सुरू झाली आहे. 

गेले पाच महिने एस. टी. कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपामुळे प्रवाश्यांना खूप मनस्ताप सहन करावा लागला. खाजगी वाहनांना अव्वाच्या सव्वा रक्कम द्यावी लागत होती. परंतु एस.टी. बस चा संप मिटला आणि प्रवासश्यांची खास करून कोकणातल्या नागरिकांची लाडकी लाल परी रस्त्यावर धावू लागल्याने प्रवाश्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. भिरा, पाटणूस, विळे, साजे, रवाळजे, आतोने, नांदगाव, पोटलज, गोकुळवाडा, शरद वाडी, पाच्छापूर फाटा, अडुळसा, सिद्वेश्वर, भार्जे, वावळोली, झाप, पाली व पाली ते खोपोली, पनवेल, ठाणे,  बोरिवली असा या एस. टी. चा मार्ग असल्याने अनेक प्रवाश्यांना फायदा होतो शिवाय एस. टी. कायम प्रवाश्यांची फुल चालत असल्याने एस. टी महामंडळालाही याचा फायदा होतो. सदर च्या एस. टी. बस. सोबत खेड्यातील अनेक बस सुरू झाल्याने व शाळांनाही सुट्या पडल्याने गावी येणाऱ्या चाकरमान्यांचा मार्ग सुकर झाला आहे.

Popular posts from this blog