राजभवन - मुंबई ते रोहा मोटारसायकल महारॅलीचे नागोठणे शहरात जंगी स्वागत
प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाने केले आयोजन
नागोठणे : महेंद्र माने
प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या संस्थेमार्फत आझादी के अमृत महोत्सव से स्वर्णिम भारत की और च्या अंतर्गत राजभवन ते रोहा मोटारसायकल महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीची सुरुवात 1 मार्च रोजी राजभवन- मुंबई येथून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आले.साधारण 30 मोटरसायकल असलेल्या या महारॅलीचे 24 एप्रिल रोजी नागोठणे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आगमन झाल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.त्यानंतर सदरील रॅली छत्रपती शिवाजी महाराज बाजार पेठ,खुमाचा नाका,के.एम.जी. चौक मार्गे जोगेश्वरी मंदिरात रॅलीतील मोटारसायकल स्वारांचे नागोठणे सेवा केंद्राकडून सत्कार करून रॅलीचे समारोप करण्यात आले. यावेळी जि.प.सदस्य किशोर जैन, मंदिर ट्रस्टचे सचिव भाई टके, नागोठणे उपसरपंच मोहन नागोठणेकर,पिंगोडे सरपंच संतोष कोळी,माजी सरपंच विलास चौलकर, सुरेश जैन,ज्ञानेश्वर साळुंखे, यांच्यासह डॉ.राजेंद्र धात्रक,डॉ.रविंद्र ताले,पी.एस.आय. नारायण चव्हाण,प्रमोद जांबेकर,धनंजय जगताप,मंगेश कामथे,प्रथमेश काळे,जितेंद्र जाधव तसेच विश्व विद्यालयाच्या तारा दीदी,भारती दीदी,मंदा दीदी,भावना दीदी,अंजु दीदी,पूनम दीदी,किशोर केदारी तसेच नागोठणे सेवा केंद्राचे सदस्य उपस्थित होते.
त्यानंतर जोगेश्वरी मातेच्या प्रांगणात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमाची सुरुवात रिद्धी शिद्धी ग्रुपने नृत्य व दीप प्रज्योलन करून करण्यात आले. उपस्थितांचे शाल, श्रीफळ, भेट वस्तु व प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर भावना दीदी यांनी रॅलीचा मुखी उद्देश व प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या कार्याबद्दलची माहिती सांगितली. यावेळी व्यसन मुक्ति बाबत एक पथनाट्य सादर करण्यात आले. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता अमोल अडोलकर, मंगेश पानकर,मिलिंद ताले, शोभा ताले, कल्पना टके,उषा जाधव, निर्मला रावकर, आशालता काकडे, सुजाता महापात्रा, सुनंदा नागोठाणेकर, शुभांगी केदारी, अश्विनी जाधव, अंजली जाधव, अंजली जोगत यांच्यासह नागोठणे सेवा केंद्राचे सदस्यांनी अपार मेहनत घेतल्याची माहिती केंद्राचे किशोर केदारी यांनी दिली.