घोसाळे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर, मोफत औषध उपचार व मोफत नेत्र चिकीत्सा शिबीर
प्रतिनिधी : चंद्रशेखर सावंत
माणुसकी प्रतिष्ठान रोहा शाखेतर्फे घोसाळे गावामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर, मोफत औषध उपचार व मोफत नेत्र चिकीत्सा शिबीर राबवण्यात आला. या शिबीरासाठी अलिबाग येथून डॉ .राजाराम हुलवान, डॉ. शुभदा कुडतलकर उपस्थित होत्या.
शिबिराला गावातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. उद्घाटक म्हणून गावच्या सरपंच सौ प्रतिभा संतोष पार्टे यांच्या हातून फित कापून कार्यक्रमाची सुरुवात केली गावातून प्रतिष्ठित व्यक्ती किसन मोरे, संतोष पार्टे व ग्रामस्थ उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोहा शाखेतून महेंद्र भातीकरे, चंद्रशेखर सावंत, दादा पवार, विष्णू नरे ,असीम शहाबंदर, राजू किन्नरे, विभा भातीकरे, अश्विनी फुलारे, नम्रता फुलारे, गिरीष मढवी, यशवंत घाग यांनी प्रचंड मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचे योगदान दिले. सदरच्या शिबीरामध्ये ग्रामस्थांकडून अशाच प्रकारची आरोग्य शिबीरे वेळोवेळी राबविण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. त्या मागणीला माणुसकी प्रतिष्ठान रोहा शाखेतर्फे सकारात्मक आश्वासन देण्यात आले.