महेश ठाकूर यांना उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार
रोहा : प्रतिनिधी
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले रोहा तालुक्यातील पालेखुर्द येथील श्री महेश ठाकूर यांना "समर्थ वैभव" वृत्तपत्रातर्फे उत्कृष्ट समाजसेवक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सामाजिक युवा कार्यकर्ते श्री महेशजी ठाकूर यांच्याबद्दल सांगायचे तर त्यांचे शिक्षण बी.कॉम पदवीधर रोहा येथे झाले. कॉलेजमध्ये असताना एन.एस.एस. राष्ट्रीय सेवा योजना मध्ये सहभाग घेतला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्यस्तरीय विविध शिबिरांमध्ये सहभाग घेतला. तेथूनच त्यांना समाजसेवेची आवड निर्माण झाली.
कै.श्री बापु हरिभाऊ ठाकुर (काका) यांच्या पश्चात त्यांनी सामाजिक चळवळीचा वारसा अखंडपणे त्यांनी चालू ठेवला आहे. गावात वाळीतीची झळ बसलेला एक युवक २००८ साली वयाच्या २१ व्या वर्षी पालेखुर्द गावामधुन संभे ग्रुप ग्रामपंचायतीच्या निवडणूकीमध्ये ते बिनविरोध निवडुन आले. त्यावेळी रोहा तालुक्यात सर्वात कमी वयात निवडुन आलेले त् एकमेव उमेदवार ठरले. त्यानंतर पुढच्या दोन निवडणूकीमध्ये त्यांच्याच पॅनलने विजय मिळवला आहे.
तंटामुक्त समीतीचे अध्यक्षपद गेली अनेक वर्ष ते सांभळत असुन गाव ऐकोप्याने नांदत आहे. गेली १७ वर्षे या आपल्या समाजसेवेमध्ये सांस्कृतिक सामाजिक अनेक उपक्रम राबविले. त्यामुळेच रोहा तालुक्यात सर्वांना परिचीत असे व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख बनली आहे. २०१० ला पालेखुर्द गावात गॅस्ट्रोची साथ आली होती. गावात भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु महेशजी ठाकुर यांनी परिस्थीतीचे गांभीर्य ओळखुन सरकारी यंत्रणेला (जिल्हा प्रशासन, तालुका यंत्रणा, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी सर्कल, पोलीस पाटील) यांना कळवून गावातील ६८ पेशंटना प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडी, उपजिल्हा रूग्णालय रोहा, जाधव हॉस्पिटल, जिल्हा रुग्णालय अलिबाग ला जसे जमेल तसे हलविले. त्यानंतर १२ दिवस जिल्हा डॉक्टरांचे पथक पालेखुर्द गावात साथ नियंत्रणात येईपर्यंत होते. या भीषण साथीमध्ये ग्रामदैवत श्री काळभैरव महारा़जांचा आशिर्वादामुळे "देव तारी त्याला कोण मारी" या म्हणीप्रमाणे सर्व ६८ पेशंटचे प्राण वाचले. क्रिडा क्षेत्रमध्ये सुद्धा त्यांनी क्रिकेट, कबड्डी खेळाडुंना नेहमीच प्रोत्साहन दिले. कोलाड विभाग कबड्डी चे अध्यक्ष पद सुद्धा भुषविले. त्यांच्याच अध्यक्षतेखाली सर्वात मोठी कबड्डीची लिग २०१९ ला पार पडली. १८ डिसेंबर २०२१ ला रोहा तालुका पहिल्या कबड्डीचे विजेतेपद पटकाविले. त्यांच्या मित्रमंडळामार्फत गावात, विभागात व तालुक्यामध्ये विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबविले आहेत व सतत सामाजिक उपक्रम चालू आहेत. अशा प्रकारे त्यांच्या या भरीव सामाजिक कार्याबद्दल त्यांना हा जिल्हास्तरीय आदर्श समाजसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
या पुरस्काराबद्दल सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वरिषाव होत आहे.