रोहा-कोलाड मार्गावरील बिल्डींग अनधिकृत?
जिल्हाधिकारी कार्यालयातून रोहा तहसिलदार यांना चौकशीचे आदेश
रोहा : किरण मोरे
रायगड जिल्ह्यातील रोहा-कोलाड मार्गावरील सर्वे नं. २२/१ ते ६अ आणि २२/२४ या मिळकतीवर तळमजला + सात दोन सात मजल्याच्या इमारतीचे बांधकाम करून त्याठिकाणी वर्धमान रेसिडेन्सी नावाची इमारत उभारण्यात आली आहे. हे बांधकाम बेकायदेशीर असून त्यामध्ये मंजूर आराखड्याचे उल्लंघन करण्यात आलेले असून या बांधकामावर निष्कासनाची कारवाई करून बिल्डरवर एमआरटीपी अन्वये कारवाई करण्याबाबत मंगेश हेदुलकर यांनी उच्चस्तरिय तक्रार दाखल केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी रायगड यांच्या कार्यालयातून याप्रकरणी तहसिलदार रोहा यांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
अर्जदार यांनी केलेल्या तक्रार अर्जामधील मुद्द्यांवर सविस्तर चौकशी करून प्रस्तुत मिळकतीमध्ये अनधिकृत बांधकाम आढळून आल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ अन्वये तसेच शासनाने वेळोवेळी प्रचलित केलेल्या निर्देशानुसार तात्काळ कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा असे जिल्हाधिकारी कार्यालयातून तहसिलदार रोहा यांना देण्यात आलेल्या पत्रात नमूद केलेले आहे.