कुंभोशी बंदर ते खारापटी बंदर शिरहोड्यांची स्पर्धा संपन्न
चणेरा/रोहा : रोहित कडू
खारापटी ग्रामस्थांनी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शिरहोड्यांची स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेची सुरुवात कुंभोशी बंदर ते खारापटी बंदर अशा प्रकारे करण्यात आली. या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात रोहा तालुक्यातील शिरहोड्यांनी सहभाग घेतला.
स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या स्पर्धेत प्रथम क्रमांक श्री गोपाळ दाभाडे महालक्ष्मी एक्सप्रेस लक्ष्मीनगर, द्वितीय क्रमांक श्री. शशिकांत पोकळे खारापटी, तृतीय क्रमांक श्री. द्वारकानाथ पोकळे खारापटी, चतुर्थ क्रमांक श्री वामन शेळके, पाचवा क्रमांक श्री. गणेश दाभाडे लक्ष्मीनगर यांना बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी माजी पंचायत समिती सभापती राजेश्रीताई पोकळे, मा. सरपंच राजूशेठ पोकळे, मा. सरपंच संदिपशेठ चोरगे, नवनीतदादा डोलकर, नथुराम तांडेल, उत्तमभाऊ नाईक, पोलीस अधिकारी गणेश नाईक, पुंडलिक पोकळे, नथुराम डोलकर, अजय पोकळे, रामकृष्ण पोकळे, चंद्रकांत कारभारी, सुहास कारभारी, विनायक कारभारी, दयु पोकळे, गणेश चौलकर, निमेश नाईक, महेश चोरगे, रमाकांत पोकळे, सुय॔कांत, पोकळे, द्वारकानाथ मळेकर, अरूणेश चोरगे, सौरभ डोलकर, बंटी चोरगे, विनोद चोरगे, काशिनाथ चोरगे, जयवंत नाईक, परशुराम पोकळे, सुशिल डोलकर, रामनाथ पोकळे, किरण पोकळे, संतोष नाईक, कृण्णा मुरेकर, अक्षद डोलकर, निडी तफें अष्टमी ग्रामपंचायत सदस्या अक्षरा अक्षद डोलकर, तेजल रविंद्र जोशी, नयनिता नवनीत डोलकर यांच्यासह मोठ्या संख्येने कोळी समाज बांधव उपस्थित होते.