नागोठणे पोलीसांनी वाघ्रणवाडी येथील बेकायदा गावठी दारूधंदा केला उद्ध्वस्त!
रोहा : समीर बामुगडे
सविस्तर वृत्त असे की नागोठणे पोलीस हद्दीतील वाघ्रणवाडी लगतच्या जंगल परिसरातील सुरु असलेला बेकायदा गावठी हातभट्टी दारूचा धंदा नागोठणे पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलीसांच्या पथकाने दिनांक 26 एप्रिल 2022 रोजी सकाळी उध्वस्त केला. गावठी दारु विरोधी मोहिमेचाच एक भाग म्हणून पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलीस ठाणे अंमलदार व पथकाने नागोठणे पोलीस ठाणे हद्दीतील वाघ्रणवाडी उत्तरेकडील जंगल परिसरात सकाळी धाड टाकली. यावेळी गावठी दारू ची एक हातभट्टी उध्वस्त करण्यात आली. दोन प्लास्टिक च्या सिंटेक्स टाक्या एक सातशे लिटरची दुसरी पाचशे लिटरची प्लास्टिक दोन बॅरल प्रत्येकी दोनशे लिटर असे सोळाशे लिटर. नागोठणे पोलिसांच्या या धाडीत 2 दोन प्लास्टिकचे बॅलर रु. 6400/ हजार थकिंमतीचे मुद्देमाल मिळून आला. हा मुद्देमाल वाहतुकीस अवजड व अवघड असल्याने सदरचा मुद्देमाल हा जागीच नष्ट करून पेटवून देण्यात आला आहे.
दरम्यान नागोठणे पोलिसांनी सुरु केलेल्या गावठी दारु विरोध मोहिमेचे संपूर्ण नागोठणे विभागातील जनतेकडून स्वागत करण्यात येत असून पोलिसांनी या गावठी दारु माफियांचा कायमचा बंदोबस्त व नायनाट करुन गावठी दारुला नागोठणे विभागातून हद्दपार करुन त्रस्त झालेल्या लोकांचा आशीर्वाद घ्यावा असे जनतेत बोलले जात आहे.
दोन सिंटेक्स टाक्या - एक ७०० लिटरची आणि दुसरी ५०० लिटरची आणि २ प्लास्टिकचे बॅरल - प्रत्येकी २०० लिटरचे असे एकूण १६०० लिटर गुळमिश्रित रसायन - ४० रुपये दराने त्याची किंमत ६४०००/- रुपये. असा एकुन ६४०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला.
सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह./२०३५ जगताप, पो.ना./840 भोईर, पोना 1409 ढुमणे आणि मपोह/१२० म्हात्रे या पथकाने केली आहे.