पाटणूस ग्रामपंचायतीच्या वतीने विकासकामांचा धडाका
महाड, पोलादपूर, माणगांव मतदार संघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष बाबूशेठ खानविलकर यांचे हस्ते भूमीपूजन सोहळा संपन्न
पाटणूस/माणगांव : आरती म्हामुणकर
माणगांव तालुक्यातील ग्रामपंचायत पाटणूसच्या सरपंच नीलिमा निगडे या 25 मार्च 2022 रोजी अधिकृतपणे आपल्या पदावर विराजमान झाल्या असल्या तरी तीन वर्षे पाटणूस पंचक्रोशित विकासकामाला ब्रेक लागल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तरीही मागच्या सर्व गोष्टी विसरून नव्या जोमाने उरलेल्या दोन वर्षात आपण विकासकामे करून पाटणूस पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मने जिंकू असे त्यांनी ठामपणे सांगितले.
त्यांनी तातडीने ग्रामपंचायत सदस्यांची मिटिंग घेऊन विकासकामांचा आढावा घेतला व लगेचच गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पाटणूस पंचक्रोशीत विकासकामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला.
नियोजित कार्यक्रमानुसार शनिवार दि. 2/4/2022 रोजी गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर तीन तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याचे अध्यक्ष मा. बाबूशेठ खानविलकर यांना ग्रामपंचायत पाटणूस च्या वतीने पाटणूस पंचक्रोशीतील विविध विकासकामाच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे निजामपूर, माणगाव, विळे, परिसरातून अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या कार्यक्रमास उपस्थित राहिले होते.
विठ्ठल नगर व म्हसेवाडी येथे RCC स्मशान भूमी शेड बांधणे,प्रत्येकी 5,00,000रु. फणशीदांड आदिवासी वाडी येथे आरसीसी रोड व स्मशान भूमी शेड बांधणे, 4,27,000 रु. म्हसेवाडी येथे सूर्यकांत राणे ते रुपेश शेलार रस्ता काँक्रीट करणें 3,27,000 रु. पाटणूस आदिवासी वाडी येथे साकव दुरुस्त करणें 5, 00, 000रु. विठ्ठल नगर येथे निवारा शेड बांधणे 2,00,000 रु. असे एकूण 24 लाख 54 हजर रु. च्या विकासकामांचे भूमिपूजन बाबूशेठ खानविलकर यांचे हस्ते करण्यात आले.
व्यापिठावरून उपस्थितांना संबोधित करताना बाबूशेठ म्हणाले पाटणूस ग्रामपंचायत माणगाव तालुक्यातील आर्थिक दृष्ट्या अतिशय सक्षम अशी ग्रामपंचायत आहे. ही ग्रामपंचायत लाखो रुपयांची विकास कामे स्वतःच्या बेसवर करू शकते त्यामुळे विकास कामांच्या बाबतील पाटणूस गामपंचायत नेहमी अग्रेसर असते. परंतु आपसी मदभेदामुळे काहीवेळा विकास कामामध्ये व्यत्यय येतो. इतर ग्रामपंचायतींचे असे नाही आर्थिक दृष्ट्या कमजोर असणाऱ्या ग्रामपंचायत बाहेरून फंड आणतात व कोणतेही वाद न करता विकास कामे करून घेतात. या वेळी व्यास पिठावर प्रमुख अतिथी म्हणून मा. संदीप जाधव (राष्ट्रवादी कॉ. अध्यक्ष निजामपूर विभाग )सचिव किरण पागार, देविका पाबेकर (महिला अध्यक्ष राष्ट्रवादी कॉ. निजामपूर विभाग ), गणेश सकपाळ (रा. कॉ. अध्यक्षविळे विभाग ), बाळासाहेब दबडे (कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ), मिलिंद फोंडके, बाबू पोळेकर, शाम तवटे, निलेश वांजळे, जयदीप म्हामुणकर, अनिकेत महामुनी, पाटणूस सरपंच नीलिमा निगडे, सदस्य चंद्रकांत मोरे, रोशन पवार, प्रकाश निजामपूरकर, सदस्यां दुर्वा कमलेश चव्हाण, रिया निगडे, रा. कॉ. जेष्ठ कार्य कर्ते विजय राणे, कमलेश चव्हाण, प्रवीण सावंत, विळे विभाग व विभागातील सक्रिय कार्यकर्ते सिद्देश पाबेकर, शरद सावंत, नंदू निगडे, म्हसेवाडी ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते आंदेश दळवी, संतोष सुतार, सूत्र संचालक प्रभाकर सावंत, पंच क्रोशितील ग्रामस्थ व महिला बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी व्यासपिठावर प्रमुख अतिथी म्हणून संदीप जाधव (राष्ट्रवादी काँ. अध्यक्ष निजामपूर विभाग) सचिव किरण पागार, निजामपूर विभाग रा. काँ. महिला अध्यक्ष देविका पाबेकर, विळे विभाग रा. कॉ. अध्यक्ष गणेश सकपाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब दबडे, मिलिंद फोंडके, बाबू पोळेकर, शाम तवटे, निलेश वांजळे, जयदीप म्हामुणकर, अनिकेत महामुनी, पाटणूस सरपंच नीलिमा निगडे, सदस्य चंद्रकांत मोरे, रोशन पवार, प्रकाश निजामपूरकर, सदस्या दुर्वा कमलेश चव्हाण, रिया निगडे रा. काँ. ज्येष्ठ कार्यकर्ते विजय राणे, कमलेश चव्हाण, प्रवीण सावंत विळे विभाग व अन्य रा. कॉ. कार्यकर्ते शरद सावंत, सिद्देश पाबेकर, नंदू निगडे, ग्रामस्थआंदेश दळवी, संतोष सुतार, सूत्र संचालक प्रभाकर सावंत, पंचक्रोशितील ग्रामस्थ व महिला बहुसंख्येने उपस्थित होते.