भगवा चषक 2022 चे श्री जोगेश्वरी क्रिकेट क्लब ठरले मानकरी
नागोठणे : महेंद्र माने
नागोठणे येथील श्री जोगेश्वरी क्रिकेट क्लब आयोजित शिवजयंती उत्सव कमिटी अध्यक्ष प्रकाश मेस्त्री यांच्या वाढदिवसाचे औचित्त साधून रविवार 3 व सोमवार 4 एप्रिल रोजी भगवा चषक 2022 चे श्री जोगेश्वरी क्रिकेट क्लब मानकरी ठरले. जोगेश्वरी नगर येथे आयोजन करण्यात आलेल्या भगवा चषक भव्य नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट सामान्यांचे उद्घाटन रविवार 3 एप्रिल रोजी सरपंच डॉ.मिलिंद धात्रक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच मोहन नागोठणेकर,उपविभागप्रमुख संजय महाडीक, शाखाप्रमुख धनंजय जगताप,शिवजयंती उत्सव कमिटी अध्यक्ष प्रकाश मेस्त्री,ग्रा.प.सदस्य सुरेश जैन व ज्ञानेश्वर साळुंखे यांच्यासह रविंद्र म्हात्रे,सुभाष बामणे,किरण लाड,शेखर जोगत तसेच क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.
रविवार व सोमवार रोजी घेण्यात आलेल्या या सामन्यांमध्ये एकुण 32 संघांनी भाग घेतला. सोमवार 04 एप्रिल रोजी जि.प.सदस्य किशोर जैन,शाखाप्रमुख धनंजय जगताप, शिवजयंती उत्सव कमिटी अध्यक्ष प्रकाश मेस्त्री,ग्रा.प.सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे,नितिन राऊत, शेखर जोगत, सुभाष बामणे तसेच क्रिकेट प्रेमींच्या उपस्थितीत झालेल्या बक्षीस समारंभात भगवा चषकाचे मानकरी प्रथम क्रमांक श्री जोगेश्वरी क्रिकेट क्लब त्यांना भव्य भगवा चषक व रोख रु.10,000/-, व्दितीय क्रमांक देवलाई देवी क्रिकेट संघ यांना भव्य भगवा चषक व रोख रु.07,000/- तृतीय क्रमांक साई रामनगर क्रिकेट संघ यांना भव्य भगवा चषक व रोख रु.04,000 /-, चतुर्थ क्रमांक ओमकार कोळीवाडा यांना भव्य भगवा चषक व रोख रु. 04,000 /- तसेच मॅन ऑफ द सिरिज भूषण काटे, मॅन ऑफ द मॅच योगेश देवरे,उत्कृष्ट फलंदाज मनोज घरत, तर उत्कृष्ट क्षेत्र्रक्षक टिळक कोळी तसेच पब्लिक हीरो राजेश सुर्वे यांनाही बक्षिस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. हे सामने उत्तम पद्धतीने पार पाडण्यासाठी ज्ञनेश्वर साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली जोगेश्वरी क्रिकेट क्लबचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच जोगेश्वरी नगर ग्रामस्थांनी अपार मेहनत घेतली.