मनसे माथाडी कामगार चषक 2022 चे साई रामनगर ठरला मानकरी

नागोठणे : महेंद्र माने 

नागोठणे येथील माथाडी कामगार सेना तालुकाध्यक्ष विनायक तेलंगे व माथाडी कामगार सेना विभाग अध्यक्ष नरेश भंडारी आयोजक व जय हनुमान क्रिकेट क्लब आंगरआळी संयोजक शुक्रवार 08 व शनिवार 09 एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या मनसे माथाडी कामगार चषक 2022 चे साई रामनगर क्रिकेट संघ मानकरी ठरला. जोगेश्वरी नगर येथे आयोजन करण्यात आलेल्या या भव्य नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट सामान्यांचे उद्घाटन शुक्रवार 08 एप्रिल रोजी मनसे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड व दक्षिण रायगड जिल्हा सचिव अमोल पेणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी मा.का.सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड,माणगांव तालुकाध्यक्ष प्रतीक रहाटे, मनसे रोहा तालुका सचिव साईनाथ धुळे,जिल्हा उपाध्यक्ष रोजगार व स्वयंरोजगार प्रल्हाद पारंगे,मा.का.सेना तालुका उपाध्यक्ष गोरखनाथ पारंगे,मा.का. सेना तालुकाध्यक्ष विनायक तेलंगे,रोहा तालुका महिला सेना अध्यक्षा दीपश्री घासे,मा.का.सेना विभाग अध्यक्ष नरेश भंडारी यांच्यासह स्वरा भंडारी,भावना भोईर,शीतल कदम तसेच क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.

या सामन्यांमध्ये एकुण 32 संघांनी भाग घेतला असून शनिवार 09 एप्रिल रोजी मा.का.सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राजेश उज्जनकर, सरचिटणीस राजन शितोळे,चिटणीस यशवंत हाडगे,मा.का.रायगड जिल्हा संघटक महेश पंडित,मा.का.सेना रायगड जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड,मनसे वा.सेना रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुभोध जाधव,कल्याण शहर अध्यक्ष पंकज डोईफोडे,गणेश खंडारे तसेच क्रिकेट प्रेमींच्या उपस्थितीत झालेल्या बक्षीस समारंभात प्रथम क्रमांक साई रामनगर नागोठणे त्यांना भव्य चषक व रोख रु.15,000/-, व्दितीय क्रमांक जय भवानी चिंचवली यांना चषक व रोख रु.10,000/- तृतीय  क्रमांक देवलाई देवी चिकणी यांना भव्य चषक व रोख रु.05,000 /-,चतुर्थ क्रमांक ओम सेव्हन स्टार कोळीवाडा यांना भव्य चषक व रोख रु. 04,000 /- तसेच सामना वीर जीवन बेंडकुळे,मालिका वीर मनोज घरत,उत्कृष्ट फलंदाज महेंद्र अंधेरे,उत्कृष्ट गोलंदाज निखिल देवरे,उत्कृष्ट क्षेत्ररक्षक श्रीनंदन भिल्लारे तसेच सर्व संघांना मॅन ऑफ द मॅच देण्यात आल्याची माहिती नरेश भंडारी यांनी देऊन या स्पर्धेत विविध क्षेत्रातील मान्यवर व माध्यमांची उपस्थिती व सहकार्य लाभले असून त्या सर्वांचे आभार मानले.

Popular posts from this blog