राजिप शाळा पालेखुर्द येथे शाळा पुर्वतयारी मेळावा संपन्न
पालेखुर्द गावाचे युवानेते, तंटामुक्त समीतीचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य महेश ठाकुर यांच्या हस्ते उद्घाटन
रोहा : प्रतिनिधी
रोहा तालुक्यातील राजिप शाळा पालेखुर्द येथे मंगळवार 19 एप्रिल 2022 रोजी शैक्षणिक वर्ष 2022-2023 मध्ये दाखलपात्र विद्यार्थ्यांसाठी शाळापुर्व तयारी मेळाव्याचे आयोजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
यावेळी पालेखुर्द गावाचे युवानेते, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य महेश ठाकुर यांच्या शुभहस्ते फित कापुन उद्घाटन झाले. कार्यक्रमाची सुरूवात विद्यार्थ्यांनी लेझीम खेळून, प्रभातफेरी काढुन केली. प्रभातफेरी मध्ये सर्व दाखलपात्र विद्यार्थि व इयत्ता पहिली ते चौथी चे सर्व विद्यार्थी तसेच माता पालक उपस्थित होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका मढवी मॅडम यांनी शाळेमध्ये विवीध प्रकारच्या शैक्षणीक प्रदर्शनाचे स्टॉल ऊभारून विद्यार्थ्यांना सामाजिक, शैक्षणिक, बौद्धीक आणि भाषीक ज्ञान मिळावे यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे युवानेते महेश ठाकुर, संभे ग्रामपंचायत उपसरपंच आदिती बाकाडे, सदस्या सई ठाकुर, मुख्याध्यापक मढवि मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व शाळा व्यवस्थापन समिती सभासद, पालकवर्ग, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.