मोरे महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा मुंबई विद्यापीठाच्या 'राष्ट्रीय सेवा योजना' निवासी शिबिरात सहभाग
चणेरा/रोहा : रोहित कडू
एम बी मोरे कला वाणिज्य आणि विज्ञान महिला महाविद्यालय, धाटाव, रोहा येथील 'राष्ट्रीय सेवा योजना' (NSS) अंतर्गत विद्यार्थिनींनी मुंबई विद्यापीठस्तरीय सात दिवसीय निवासी शिबिरात सहभाग घेतला.
मुंबई विद्यापीठ आणि एस. एस. टी. कला वाणिज्य महाविद्यालय उल्हासनगर, ठाणे यांनी संयुक्तिकरित्या 'आजादी का अमृतमहोत्सव' विशेष सात दिवसीय (२० मार्च ते २६ मार्च) निवासी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात मोरे महिला महाविद्यालयातील 'राष्ट्रीय सेवा योजना' (NSS) विभागातील स्वयंसेविका कु किरण प्रवीण रुपारेल आणि कु सुकन्या शरद कान्हेकर (वर्ग : तृतीय वर्ष विज्ञान) यांनी सहभाग घेतला.
'राष्ट्रीय सेवा योजना' (NSS) अंतर्गत स्वयंसेविकांना नेतृत्वगुण विकास, शिस्तीचे पालन, श्रमदान, योगा प्रशिक्षण, शारीरिक आणि मानसिक विकास आदी विषयांवर व्याख्याने, प्रशिक्षण आणि चर्चासत्रांचे मार्गदर्शन लाभले.