सर्पमित्र के. टी. शिर्के यांनी दिले 8 फूटी सापाला जिवदान!
अजगर जातीची होता साप, सुरक्षित दिले जंगलात सोडून
नागोठणे : महेंद्र माने
नागोठणे येथील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रूपेश पोटे यांच्या सर्व्हिस सेंटरच्या बाजूला असलेल्या जाळीत मंगळवार 22 मार्च रोजी सर्प अडकल्याही माहिती मिलिंद घाग यांनी रिलायन्स वसाहतीत राहणारे सर्पमित्र के. टी. शिर्के यांना दिली. साप अडकल्याचे समजताच शिर्के यांनी तातडीने नागोठणे शहरातील सर्व्हिस सेंटर येथे येऊन सापाला साधारण दोन ते अडीच तासाच्या अथक प्रयत्नानंतर जाळ्यातून बाहेर काढण्यात यश मिळविले. याबाबत के. टी. शिर्के यांनी माहिती देताना सांगितले की, सदरील साप हा अजगर जातीचा बिनविषारी साधारण 8 फुट लांबीचा असून तो येथे कबुतराची अंडी शोधत आला असल्याचा अंदाज असून बहुतेक तो अंडी शोधताना जाळ्यात अडकला. या सापाला साधारण दोन ते अडीच तासाच्या अथक प्रयत्नानंतर जाळ्यातून बाहेर काढण्यात यश आले. सदरील सापाला नजीकच्या जंगलात सुरक्षितपणे सोडून देण्यात आल्याचे सांगून सापाची कोणतीही माहिती नसताना मला अजगर जाळ्यातून बाहेर काढायला मिलिंद घाग व रूपेश पोटे यांनी मदत केल्याने त्यांचे कौतुक करीत असल्याचे शेवटी के. टी. शिर्के यांनी सांगितले.