दारूच्या नशेत तरूणांची महिलेस हाताबुक्क्याने मारहाण! 

माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

माणगांव : प्रतिनिधी

माणगांव तालुक्यातील खरवली विभागातील सुरव तर्फे तळे गावामध्ये होळी सणाची धुळवड चांगलीच साजरी झाली अशी चर्चा खरवली पंचक्रोशी मध्ये चांगलीच रंगली आहे.तंटामुक्ती अध्यक्षांच्या  मुलाकडूनच गावातील कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागले आहे. एका महिलेला घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दि. १९ मार्च रोजी रात्री १.३० वा. च्या सुमारास मौजे सुरव तर्फे तळे येथील फिर्यादी दीपिका दीनानाथ जाधव, वय  ५८ वर्षे व जखमी स्वाती राकेश बागुल  ह्या जेवण करून त्यांच्याकडे पाहुणे येणार असल्याने त्यांची वाट पाहत असताना त्याचे गावात एक चारचाकी गाडी आली. त्यात गावातील शेजारी राहणारे हे गाडीतून उतरून घरी गेले. गाडी चालक हा गाडी वळवित असताना फिर्यादी यांच्या घरासमोर राहणारा आरोपी सौरभ दिलीप जाधव हा दारूच्या नशेत होता. त्याने फिर्यादिस शिवीगाळ केली. म्हणून फिर्यादी याने आरोपी सौरभ यास शिवीगाळ का करतोस ?असे विचारले असता त्याचा राग येऊन तो आणखीच शिवीगाळ करीत असल्याने त्यावेळी आरोपी यांचा काका विवेक धोंडू जाधव असे दोघेजण संगनमत करून फिर्यादी यांच्या घरात घुसुन फिर्यादी व जखमी यांना हाताबुक्क्याने मारहाण करून दुखापत केली. या झटापटीत फिर्यादी यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटून गहाळ झाले. आरोपी यांनी घराबाहेर जाऊन हातात दगड घेऊन फिर्यादी याच्या घराच्या समोरील खिडकीवर फेकून मारून काचा फोडून नुकसान केले. व दमदाटी करून ठार मारण्याची धमकी दिली.

याबाबत माणगांव पोलीस ठाणे येथे कॉ. गु. र. नं. ५९/२०२२ भा. दं. वि. सं. क. ४५२, ३२३, ५०४, ५०६, ४२७, ३४ प्रमाणे करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार रावसाहेब कोळेकर करीत आहेत.

Popular posts from this blog