महाराष्ट्र राज युवा पत्रकार संघातर्फे २१ मार्च रोजी होणार अनन्य साधारण व्यक्तिमत्व सन्मान सोहळा 

नागोठणे : श्वेता वैशंपायन

महाराष्ट्र राज युवा पत्रकार संघातर्फे अनन्य साधारण व्यक्तिमत्व सन्मान सोहळा २०२२ चे आयोजन सोमवार २१ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ६.३० वाजता नागोठणे येथील आठवडे बाजाराच्या मैदानात करण्यात आले आहे. 

हा कार्यक्रम रायगडच्या पालकमंत्री आदीतीताई तटकरे, कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू, कोकण आयुक्त विलास पाटील, पोलीस महानिरिक्षक कोकण परिक्षेत्र संजय मोहिते, आमदार रवीशेठ पाटील, आमदार भरतशेठ गोगावले, जिल्हा परिषद सदस्य किशोरशेठ जैन, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, नागोठणे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, कुणबी समाजाचे रोहा अध्यक्ष शिवरामभाऊ शिंदे, रोहा पं. स. सदस्य संजय भोसले, सर्वधारा जनआंदोलनाच्या संस्थापक उलकाताई महाजन, म. रा. यु. पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष राज वैशंपायन, कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. सुरेश माने, रोहा पं. स. सदस्य बिलाल कुरेशी, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी अरुण शिर्के या प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत होणार आहे.

ख्यातनाम गायक जगदीश पाटील, सुप्रसिध्द गायिका सोनाली भोईर, हर्षला पाटील, हास्यसम्राट जॉनी रावत, बिग बॉस फेम गायक संतोष चौधरी (दादुस) यांचा गायनाचा कार्यक्रम हे या सन्मान सोहळ्याचे विशेष आकर्षण असणार आहे. या कार्यक्रमासह सन्मान सोहळ्याला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन संघाचे अध्यक्ष याकूब सय्यद, सचिव संदेश गायकर, खजिनदार प्रविण बडे, मंजुळा म्हात्रे, श्‍वेता वैशंपायन, अ‍ॅड. स्वपील दिघे यांनी केले आहे. 

२१ मार्च रोजी यांचा होणार सन्मान

वृषाली यादव - तानुबाई बिर्जे सर्वोत्कृष्ठ निवेदिका पुरस्कार (एबीपी माझा), स्वाती लोखंडे - सावित्रीबाई फुले सर्वोत्कृष्ट महिला पत्रकार महाराष्ट्र (न्यूज १८ लोकमत), समाधान पाटील - डॉ.बाबसाहेब आंबेडकर सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार  (दैनिक राम प्रहर), विनोद राऊत - आचार्य अत्रे सर्वोत्कृष्ट स्तंभलेखक पुरस्कार (मुंबई सकाळ), मिलिंद तांबे - महात्मा फुले सर्वोत्कृष्ट सामाजिक पत्रकार (मुंबई सकाळ), लक्ष्मण आडाव : आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार

संगीत क्षेत्र उल्लेखनीय कामगिरी

जगदीश पाटील - स्वर भूषण पुरस्कार, सोनाली भोईर - स्वर सरिता पुरस्कार, संतोष चौधरी - स्वर सागर पुरस्कार, हर्षला पाटील - स्वर साधना पुरस्कार, अभिलाषा म्हात्रे (पीटी उषा सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार), कु.विवेक शिंदे (दौलतराव शिंदे उत्कृष्ट खेळाडू २०२२), राजेश सुर्वे-(ध्यानचंद उत्कृष्ट क्रीडा संघटक २०२२), शफी पुरकर (आदर्श संपादक-२०२२), विजय देवकाते आदर्श  शिक्षक २०२२)

Popular posts from this blog