दादर येथे जागतिक महिला दिन साजरा
रायगड : शेखर सावंत
दादर येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोत्ती अभियान व ग्रामपंचायत दादर यांच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोत्ती अभियान अंतर्गत दादर गावामध्ये बचत गट स्थापन करण्यासाठी शासनाच्या वतीने 15 दिवसांचा कनिष्ठ वर्धिनी फेरी चे आयोजन कारण्यात आले आहे. दादर प्रभागाच्या प्रभाग समन्वयक प्रीती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावामध्ये बचत गट स्थापन करून त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी उपक्रम सुरु आहे सदर उपक्रम पेण तालुका अभियान कक्षाचे व्यवस्थापक शिरीष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग समन्वयक प्रीती पाटील या राबवित आहेत. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचात दादर व पेण तालुका अभियान व्यवस्थापन यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमासाठी गावाचे सरपंच विजय पाटील, प्रभाग समन्वयक प्रीती पाटील, आरोग्य समुदाय अधिकारी डॉक्टर रेश्मा कदम उपस्थित होते. तसेच गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांना मार्गदर्शन करताना ग्रामविकास अधिकारी सी. डी. घरत यांनी महिलानी बचत गटाच्या माध्यमातून उन्नत्ती कशी साधवी या विषयी माहिती दिली. तसेच आरोग्य समुदाय अधिकारी डॉ. रेश्मा कदम यांनी महिलांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी माहिती सांगितली. प्रीती पाटील यांनी कार्यक्रमाला संभोधताना महिला दिनाचे महत्व सांगून बचत गट बांधणी व अभियानविषयी माहिती दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी सी. डी. घरत, ग्रामपंचायत कर्मचारी आणि वर्धिनी ताई यांनी विशेष मेहनत घेतली.