भैरवीनाथ क्रिडा मंडळ मालसई आयोजीत छत्रपती शिवाजी महाराज पंचक्रोशी क्रिकेट सामन्यांमध्ये मालसई संघ प्रथम
रोहा : समीर बामुगडे
भैरवीनाथ क्रिडा मंडळ मालसई आयोजीत छत्रपती शिवाजी महाराज पंचक्रोशी क्रिकेट सामन्यांमध्ये भैरवीनाथ क्रिडा मंडळ मालसई संघाने प्रथम क्रमांक पटकावला.
प्रमुख पाहुणे म्हणून रोहा तालुका कुणबी युवा अध्यक्ष अनंत थिटे, महेश बामुगडे, श्रीमती प्रितमताई पाटील, मरवडे सर, महेश तुपकर, हेमत मालुसरे, अनिल आयरे, नथुराम मालुसरे, सुनिल मोहिते यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
या सामन्यांमध्ये प्रथम क्रमांक श्री भैरवीनाथ क्रिडा मंडळ मालसई, द्वितीय क्रमांक जाणता राजा पिंगळसई, तृतीय क्रमांक जय बजरंग लांडर, चतुर्थ क्रमांक जे बी सी धामणसई अशा प्रकारे विजेत्यांना बक्षीसे देण्यात आली.
याप्रसंगी मंडळाचे पदाधिकारी परेश मालुसरे, आकाश मोहिते, कुमार धनावडे, निमेश मालुसरे, मनिष मुरके, राहुल तेलगे, अनिकेन चाळके, गणेश मालुसरे, मारुती मालुसरे, सुयोग आयरे, प्रतिक मालुसरे, हर्षद आयरे आदी उपस्थित होते.