माणगांव भाजप तालुकाध्यक्ष आप्पा ढवळे यांनी घेतली निजामपूर उपसरपंचाची सदिच्छा भेट
माणगांव : प्रमोद जाधव
काही वर्षांपूर्वी झालेल्या माणगांव तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत निजामपूर मध्ये निजामपूर विकास आघाडीचा पॅनल विजयी होऊन सत्तेत आला आणि सरपंच पदावर राजाराम रणपिसे विराजमान झाले आणि आघाडीतील प्रत्येक घटक पक्षाला उपसरपंच पदाची संधी देण्यात आली. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीमध्ये भाजप चे सदस्य असणाऱ्या गणेश मारुती कासार यांची ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर निवड झाली.
गणेश कासार यांची उपसरपंच पदावर निवड झाल्यानंतर निजामपूर विभाग व माणगाव तालुक्यातील विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. अश्याच प्रकारे निजामपूर ग्रामपंचायत च्या नवनियुत उपसरपंचांची भेट घेऊन शुभेच्छा माणगाव तालुका भाजप अध्यक्ष संजय आप्पा ढवळे यांनी गणेश कासार यांच्या घरी उपस्थिती दर्शविली. यावेळी गणेश कासार यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी भाजप तालुका अध्यक्ष संजय आप्पा ढवळे यांच्या समवेत निजामपूर विभागातील भाजप चे ज्येष्ठ सदस्य तथा माजी उपाध्यक्ष मारुती कासार गुरुजी, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष शर्मिला सत्वे, महिला मोर्चा उपाध्यक्ष यशोधरा गोडबोले, तालुका सरचिटणीस उमेश साटम, उपाध्यक्ष बाबुराव चव्हाण,युवामोर्चा माणगाव तालुकाध्यक्ष विशाल गलांडे, खजिनदार संजय जाधव, भाजप निजामपूर विभाग अध्यक्ष गोविंद कासार व भाजप युवा कार्यकर्ते राहूल धुपकर आदी उपस्थित होते.