रोहा उरूस कमिटी अध्यक्षपदी नसीम महाडकर
कोरोना ओसरल्यामुळे उरूस होणार जल्लोषात!
रोहा : समीर बामुगडे
सर्व हिंदू मुस्लिम धर्मियांच्या ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहे शहरातील गाझी शेख सलाऊद्दीन शाह बाबा दर्गा उरूस कमिटीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते नसीम महाडकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. या बैठकीत पुढील तीन वर्षांकरिता नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. दरम्यान दरवर्षी या दर्गाचा उरूस मोठ्या भक्तीभावाने हजारो हिंदू-मुस्लिम बांधवांच्या उपस्थित होत असते मात्र कोरोनामुळे सलग तीन वर्ष उरूस व कव्वाली कार्यक्रम रद्द करण्यात होते. यावर्षी मात्र उरूस मोठया उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
उरूस कमिटीचे मावळते अध्यक्ष तयब अली मुमेरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत नव्यावे कार्यकारणी गठीत करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्षपदी नसीम महाडकर, उपाध्यक्षपदी हुसेन नुराजी, सचिवपदी आशीक सवाल, सहसचिव इरफान बडे तर कार्यकारणी सदस्य म्हणून नाझीम मुमेरे, याकूब शेख, शहाबाज शेटे, समीर दाखवे, अल्ली तवर, गनी मापकर त्याचप्रमाणे अलीम मुमेरे, आखलाक नाडकर, तयब अली मुमेरे, नदीम सिद्दीक यांची सलागारपदी निवड करण्यात आली. यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते खलील मलबारी, अल्ताफ नुराजी, इस्माईल रोहेकर, अबरार शेटे, असलम बोधले आदी जण उपस्थित होते.
या उरूस निमित्त रोहे शहरातुन रातीब मिरवणूक काढली जाते. तद्नंतर जिल्ह्यातील हजारो हिंदू मुस्लिम बांधव व भक्त दर्ग्यावर फुलांची चादर अर्पण करून दर्शन घेतात. मनोरंजन म्हणून कव्वाली कार्यक्रमाचे देखील आयोजन केले जाते. या उरूस निमित्त शेकडो लहान मोठी विविध प्रकारचे दुकाने लावली जातात. त्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होत असते अशी माहिती अध्यक्ष नसीम महाडकर यांनी दिली.