माणगांवमध्ये उतेखोल केंद्रात महिला दिन उत्साहात साजरा
माणगांव : प्रमोद जाधव
जागतिक महिला दिन कार्यक्रम उतेखोल केंद्रात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या महिला दिनी उतेखोल केंद्रातील सर्व कर्तृत्ववान महिला शिक्षीका आणि माजी कर्तृत्ववान गुणवंत विद्यार्थीनींचा सन्मान करण्यात आला. उतेखोल केंद्रातील एकूण १२ शाळामधील माजी विद्यार्थीनींमध्ये सर्व प्रथम सर्वात वयाने लहान विद्यार्थीनी वैभवी विवेक जाधव, शाळा उतेखोलवाडी हिने सेट आणि नेट या दोन्ही स्पर्धा परिक्षेत घवघवीत यश मिळवून शाळेचे नाव उज्वल केल्याबद्दल सन्मान करण्यात आला. दुसरा सत्कार हा माणगांवच्या माजी सरपंचा सुखदा धुमाळ या खांदाड शाळेतील माजी विद्यार्थीनी यांचा करण्यात आला.
अशाच प्रकारे अंकिता अंबुर्ले, माई वाढवळ, भोकर, लक्ष्मी जाधव, आदर्श शिक्षिका विनया जाधव यांनी नाणोरे शाळेतील विद्यार्थीनींना सन्मानित केले. या कार्यक्रमात स्वागत गीत उभारे बाई,निर्मल बाई,शेळके बाई यांनी सादर केले.व्यासपीठावर लोखंडे बाई, अंबुर्ले बाई, सुधा साळवी यांनी सन्मानस्थान भूषविले. पूर्ण कार्यक्रमाचे आयोजन विनया विवेक जाधव यांनी केंद्रातील महिलांना प्रेरणा देण्यासाठी केलेले दिसून आले. केंद्र प्रमुख निजापकर सर व केंद्रातील शिक्षक वर्ग वराळे सर, राठोड सर व खडतर सर यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. केल्याने होत आहे रे अधि केलेचि पाहिजे. या उक्तीप्रमाणे कार्यक्रम यशस्वी पार पडला.