जागतिक महिला दिनानिमित्त महिला पोलिसांकरिता आरोग्य शिबीर
रायगड : शेखर सावंत
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने रायगड जिल्हा पोलिस व माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर सामाजिक संस्था अलिबाग रायगड यांच्या सहयोगाने रायगड जिल्ह्यातील संपूर्ण महिला पोलीसांकरता विशेष आरोग्य शिबिर पोलीस मुख्य कार्यालय अलिबाग जंजिरा हॉल येथे भरवण्यात आलं होतं शिबिराला प्रमुख उपस्थिती रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे तसेच माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर सामाजिक संस्था यांचे संस्थापक डॉ राजाराम हुलवान, डॉ अश्विनी हुलवान ,डॉप्रज्योत पाटील, डॉ कलिका देवकाते ,डॉ मेघा घाटे, डॉ कीर्ती साठे, डॉ प्रतिभा म्हात्रे डॉ, ओजस्विनी तांबोळे कोतकर उपस्थित होते शिबिराची सुरुवात अशोक दुधे यांनी दीप प्रज्वलन करून केले. त्यानंतर पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या हस्ते विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी केलेल्या कामासाठी महिलांना गौरवण्यात आले व नंतर सगळ्या महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली या शिबिरामध्ये अशोक दुधे साहेबांनी आपल्या भाषणामध्ये असं सांगितलं की रायगड जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनची जबाबदारी ही महिला दिन म्हणून महिलांच्या खांद्यावर देण्यात आली आहे.