माणगांव शहरात तिथी प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
साईनगर मित्रमंडळ माणगांव ची सलग ४ वर्षांची परपंरा
उतेखोल गावच्या जिजाऊंच्या लेकींनी रायगडावरून शिवज्योत आणण्याचे पहिले वर्ष
माणगांव : प्रमोद जाधव
माणगांव शहरातील साईनगर हा विभाग सामजिक उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांसह पारंपरिक उत्सव साजरे करण्यात शहरातच नव्हे तर माणगांव तालुक्यात अग्रेसर राहिला आहे. यामध्ये तिथीप्रमाणे साजरी होणारी शिवजयंती असो किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा साईनगर चा राजा गणेशोत्सव असो... साईनगर मित्रमंडळाचे काम स्तुत्य आहे!
यावर्षी देखील साईनगर मित्रमंडळकडून तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली. त्यापैकी हे सलग ४ थे वर्ष होते. त्यामध्ये २० मार्च रोजी दुर्गदुर्गेश्वर रायगडावर जाऊन साईनगर मधील शिवज्योत अगदी धुमधडाक्यात माणगांव साईनगर येथे शिवज्योत आल्यानंतर पूजन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी नगर मधील कु. आर्यन खाडे याच्यासह बालगोपाळांनी महाराज व मावळ्यांचा पोशाख परिधान करून शिवज्योत पूजन केले. विविध समाजपयोगी कार्यक्रमानी साईनगर मित्रमंडळाची सन २०२२ ची शिवजयंती उत्साहात साजरी झाली.
माणगाव शहरातील उतेखोल गावच्या जिजाऊंच्या लेकींनी पायी आणली शिवज्योत, तरुणींचा अभिमानास्पद निर्णय
माणगांव शहरातील प्रभाग क्रमांक ४ उतेखोल गावच्या तरुणींनी संपूर्ण तालुक्याला अभिमान वाटेल असा निर्णय घेऊन,स्वतः किल्ले रायगडहून शिवजयंतीच्या निमित्ताने शिवज्योत घेऊन आल्याने आपण जिजाऊंच्या लेकी आहोत हे सिद्ध केले आहे. सगळीकडेच शिवजयंती निमित्त किल्ले रायगडहून शिवज्योत आणण्याची परंपरा वर्षानुवर्षे चालू आहे. परंतु शिवज्योत आणण्यासाठी दरवेळी गावोगावचे नवतरुण मंडळ जात असून महिलांनी किंवा तरुणींनी मंडळ बनवून आपल्या गावात धावत ज्योत आणण्याची ही पहिलीच वेळ असल्याने संपूर्ण तालुक्यातून उतेखोल गावच्या तरुणींचे विशेष कौतुक होत आहे.
अलिबाग पंचायत समिती सदस्या रचना निलेश थोरे, उतेखोलच्या नगरसेविका ममता थोरे, दीपाली मढवी, कुमुद जाधव, वैष्णवी जाधव, दिव्या मढवी व उतेखोल गावातील युवा तरुणी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या. शिवज्योत आणणे व जिजाऊच्या लेकींनी शिवजयंती साजरी करावी म्हणून उतेखोल ग्रामस्थ राकेश जाधव रमेश मढवी, निलेश थोरे, आकाश मढवी, बाबू चव्हाण, अनिकेत लांगे, नितेश जोरकर, सुशिल जठार, ऋषी जाधव, सागर जठार, सागर जोरकर उतेखोल गाव ग्रामस्थांनी प्रेरणादायी प्रयत्न केले.
यावेळी दरवर्षी पुरुष तरुण मंडळी शिवज्योत आणण्यासाठी किल्ले रायगड या ठिकाणी जात असतात, परंतु यावर्षी तरुणींनी देखील पुढे येऊन शिवजयंती साजरी करावी व त्यांचा आदर्श हा तालुक्यातील इतर तरुणी व माहिलांनीही घ्यावा हा यामागचा हेतू असल्याचे उतेखोल च्या नगरसेविका ममता थोरे यांनी सांगितले.