रोहा तालुक्याला न कळलेले कुमार देशपांडे

चणेरा/रोहा : रोहित कडू

रोहा तालुक्यात असा कोणी व्यक्ती नसेल ज्याला कुमार देशपांडे माहित नसतील! आजवर त्यांनी हजारो प्राण्यांवर उपचार केले आणि त्यांना बरे केले. तसेच कितीतरी लोकवस्ती असलेल्या ठिकाणी स्वतःच्या जीवाची परवा न करता विषारी बिनविषारी सापांना पकडून त्यांना सुखरूपपणे जंगलात सोडले. हे करत असताना 2013 साली एकदा सापचा दंश सुद्धा त्यांना झाला. सर्जरी झाली आणि दादांची एक करंगळी पूर्णपणे गेली तरी सुद्धा बरे झाल्यावर दादांनी अनेक सापांना पकडून त्यांना सुखरूप जंगलात सोडले. जखम सडलेला प्राणी मग तो कुत्रा, गाय, गाढव असो त्या सडलेल्या भागातील किडे काडून ती जखम स्वच्छ करून त्या प्राण्याला त्यांनी बरं केलं. आज तालुक्यात एक ही जखमेने सडलेला कुत्रा नाही. लॉकडाऊनमध्ये पूर्ण वर्षभर सर्व मुक्या जनावरांना अन्न दिले. या 25 वर्षाच्या प्रवासात आजवर त्यांनी 50-60 हजार प्राण्यांवर उपचार केले आहेत. पण या कामाचा प्रशासने कधीही दखल घेतली नाही. अनेकांना भूषण आणि सन्मान देऊन जिल्ह्याने गौरव केला परंतु या खऱ्या हिऱ्याला ओळखायला प्रशासन कमी पडले. उपचारासाठी लागणाऱ्या पैशासाठी कधीही कोणत्या संस्थेने, सरकारने, कंपनी ने मोठ्या प्रमाणात मदत केली नाही. जी काही तुटपुंजी मदत भेटली ती तालुक्यातील नागरिकांकडून कुमार दादांनी उपचाराच्या दरम्यान कधीही फोटो आणि व्हिडीयो काढले नाहीत. दादांनी या 20-25 वर्षात उपचारादऱ्यामान कधीही बाहेरचे अन्न पाणी आणि कोणत्याच व्यक्तीकडून उपचाराचे पैसे घेतले नाहीत. आत्ताचे युवक जे दादांसोबत काम करतात त्यांनी दादांसोबत भांडून फोटो आणि व्हिडीयो काढल्यामुळे आज दादांचं काम पूर्ण देशभरात पोहचलं आहे. आज त्याचं काम बघून कितीतरी युवक संघटित झाले आहेत आणि त्याच्यासोबत काम करत आहेत. अनेक युवकांनी एकत्र येऊन स्थापन केलेली पशु पक्षी जीवनदान संघटना आत्ता विशाल मोठ्या चळवळीचे रूप धारण करत आहे. आज संस्थे कडे अँबुलन्स आणि जागा नाही. तरीसुद्धा हे युवक दादांसोबत जिथे जागा मिळेल तिथे खाली चपला टाकून त्यावर बसून दादांना उपचारासाठी मदत करत आहेत आज जिल्ह्यातून उपचारा साठी कॉल येत आहेत. त्यामुळे लागणाऱ्या औषधांचं, सलाईनचा खर्च वाढत आहे. आर्थिक कमतरतेमुळे संस्थेला सुद्धा मर्यादा येत आहेत. पण जसं दादा बोलतात आपण फक्त निमित्त असतो, करून घेणार वर बसलेला असतो तो काहींना काही मार्ग काढत, आपण फक्त मुक्या प्राण्याना बर करायच याच विचारांनी संस्थेमधील युवक आणि कुमार दादा पूर्ण ऊर्जा आणि ताकदीने मुक्या जनावरांना बर करण्यासाठी काम करत आहेत.

Popular posts from this blog