रा.जि.प. शाळेत केंद्रस्तरीय शाळापूर्व तयारी प्रशिक्षण संपन्न
स्वाती पाटील व मंगला खाडे यांनी दिले प्रशिक्षण
नागोठणे : महेंद्र माने
कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे अंगणवाडी बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थी अंगणवाडीतील शिक्षणापासून वंचित झाले होते. कधीही शाळा बघितली नसलेले हे विद्यार्थी प्रथमच पहिलीच्या वर्गात प्रवेश करणार आहेत. त्यांची विस्कटलेली घडी बसविण्यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने शाळा पूर्व तयारी हा विशेष उपक्रम राबविला असून त्याचे प्रशिक्षण रा.जि.प.च्या कचेरी शाळा क्र.1 येथे शुक्रवार 25 मार्च रोजी राज्य शिक्षण विभागाच्या वतीने नागोठणे केंद्रातील शिक्षकांना केंद्रस्तरिय शाळापूर्व तयारी प्रशिक्षण देण्यात आले. सदरील प्रशिक्षण कचेरी शाळा शिक्षिका स्वाती पाटील व जोगेश्वरीनगर शिक्षीका मंगला खाडे यांनी दिले.
कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे अंगणवाडी बंद होत्या.त्यामुळे विद्यार्थी अंगणवाडीतील शिक्षणापासून वंचित झाले होते. कधीही शाळा बघितली नसलेले हे विद्यार्थी प्रथमच पहिलीच्या वर्गात प्रवेश करणार आहेत. त्यांची विस्कटलेली घडी बसविण्यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने शाळा पूर्व तयारी हा विशेष उपक्रम राबविला असून त्याचे तालुकास्तरीय प्रशिक्षण रोहा येथे नुकतेच संपन्न झाला. यामध्ये कचेरी शाळा शिक्षिका स्वाती पाटील व जोगेश्वरीनगर शिक्षिका मंगला खाडे यांनी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर येथील नागोठणे केंद्राचे केंद्रस्तरीय प्रशिक्षण कचेरी शाळेत शुक्रवार 25 मार्च रोजी घेण्यात आला. यावेळी येथील शिक्षिका स्वाती पाटील व जोगेश्वरीनगर येथील शिक्षिका मंगल खाडे यांच्यावतीने मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून दाखविली. यामध्ये शाळा कधीही न बघितलेल्या विद्यार्थ्यांना पहिलीच्या वर्गात प्रवेश घेताना भीती वाटू नये, दडपण येवू नये,त्यांना उत्साही वातावरणात त्यांचे स्वागत व्हावे त्यासाठी वेगवेगळ्या स्टॉलचे आयोजन कसे करावे? या संदर्भात मार्गदर्शन करून प्रात्यक्षिक देण्यात आले. तसेच येणाऱ्या मुलांचे स्वागत कक्षापासून विविध स्टॉलवर त्यांच्या पूर्वज्ञानाची तपासणी कशी करावी, विविध कार्यक्रमांचे आयोजन कसे करावे?त्यासाठी स्वयंसेवक,अंगणवाडी सेविका,पालक व शिक्षणप्रेमी यांचे सहकार्य कसे घ्यावे? या सर्व प्रशिक्षणाबाबत स्वाती पाटील व मंगला खाडे यांनी माहिती व प्रात्यक्षिक सादरीकरण केले. शेवटी सर्व शिक्षकांचे येथील केंद्रप्रमुखा नयना मुदगुले यांनी मार्गदर्शन केले.