महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होणे काळाची गरज - सरपंच संतोष कोळी
नागोठणे : महेंद्र माने
रायगडच्या पालकमंत्री ना. अदिती तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रोहा तालुक्यातील पिगोंडे ग्रामपंचायतच्यावतीने सोमवार 14 मार्च रोजी बचत गट स्थापन करणाऱ्या रायगड वर्धीनी यांचा निरोप समारंभ व हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला.त्यावेळी आजच्या महिलांनी सक्षम होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सरपंच संतोष कोळी यांनी केले. या कार्यक्रमाला उपसरपंच नाना बडे, माजी उपसरपंच सखाराम बडे, नेहा पाटील - रोहा पंचायत समिती, भारत वाघ- पेण पंचायत समिती, ग्रा.पं.सदस्य - धनाजी पारंगे,शैलेश शेलार, ग्रा.प. सदस्या - कांचन माळी,रंजना माळी, नेत्रा पारंगे,गीता पाटील,कुसुम बावकर यांच्यासह वर्धा येथून आलेल्या कविता बोसेकर,प्रतिभा धनवीज,अर्चना धनवीज,आम्रपाली गजभिजे व विद्या बनकर या रायगड वर्धीनी तसेच ग्रा.प.हद्दीतील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत रायगड वर्धीनी यांनी 01 मार्च ते 15 मार्च या काळात ग्रा.प.हद्दीतील वेलशेत व आंबेघर या गावात फिरून महिला सक्षिकरण गरीबी निर्मूलन गट बांधणी अंतर्गत एकुण 13 बचत गटांचे समूह तयार करून त्या सर्व गटांची पूजा दर्शन चोरगे यांची प्रतींनिधी म्हणून नेमणूक केली. या निमित्ताने सोमवार 14 मार्च रोजी ग्रामपंचायतच्या वतीने सर्व रायगड वार्धिंनिंचानिरोप समारंभ व हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आली.यामध्ये सर्व रायगड वार्धिंनिंना शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना संतोष कोळी यांनी सांगितले की, येथे आलेल्या रायगड वर्धिनी यांनी चांगले काम करून 13 गट स्थापन केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. आज हा कार्यक्रम ज्यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आला त्या ना. अदिति तटकरे या महिला असूनही राज्य सरकारमध्ये अनेकचे खात्यांच्या मंत्री असून रायगडच्या पालकमंत्री आहेत; त्या कोणत्याही प्रसंगामध्ये रात्री अपरात्री जनतेच्या सेवेसाठी धाऊन जात असतात त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहेत. तसेच आजच्या धकाधकीच्या जीवनात महिला पुरुषांच्या खाद्याला खांदा लाऊन काम करीत असल्या तरीही त्या सुरक्षित नाहीत. महिलांनी सक्षम होणे काळाची गरज आहे. विशेषता आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी या स्थापन केलेल्या बचत गटांचा चांगला उपयोग होणार असल्याचे सांगून महिलांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन शेवटी संतोष कोळी यांनी केले.
कांचन माळी यांनी बचत गटाचे फायदे, तो प्रगती पथावर नेण्यासाठी कसा चालवायचा? याबाबत माहिती दिली. पेण पंचायत समितीचे भारत वाघ यांनी 10/12 वी पासच्या विद्यार्थ्यांसाठी दिनद्याळ विभोजने अंतर्गत मिळणार्या प्रशिक्षणाबाबत माहिती दिली. नेहा पाटील यांनीही योग्य मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष ताडकर यांनी केले.