केंद्रीय मंत्र्यांनी नाभिक समाजाची जाहीर माफी मागावी; अन्यथा तीव्र आंदोलन - जिल्हाध्यक्ष दिनेश मोरे
नागोठणे : महेंद्र माने
केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाच्या भावना दुखावल्याने नाभिक समाजाची जाहीर माफी मागावी; अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा रायगड जिल्हा नाभिक समाज संघाचे अध्यक्ष दिनेश मोरे यांनी दिला असून तसे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
रायगड जिल्हा नाभिक समाज संघाच्या लेटरपॅडवर जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात, केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना येथे झालेल्या चर्चा सत्रात नाभिक समाजाबाबत केलेल्या बेताल वक्तव्यांनी भारतातील सर्व नाभिक समाज बाधवांच्या भावना दुखावल्या आहेत.तरी केंद्रीय मंत्री दानवे यांनी अखिल भारतीय नाभिक समाजाची जाहीर माफी मागावी; माफी न मागितल्यास होणार्या पुढील परिणामाला सामोरे जावे लागेल याची शासनांनी नोंद घेण्याची विनंती शेवटी केली आहे. अशाच प्रकारचे निवेदन रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील बहुसंख्य समाजबांधवांनी प्रांताधिकारी व पोलिस ठाण्यामार्फत जिल्हाधिकार्यांना दिले असल्याची माहिती देऊन केंद्रीय मंत्र्यांनी जाहीर माफी मागावी; अन्यथा त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे दिनेश मोरे यांनी सांगितले.