नागोठणे येथे हरिनाम सप्ताह व दिंडी सोहळा संपन्न
नागोठणे : महेंद्र माने
नागोठणे येथील संत सेवा मंडळ यांच्या विद्यमाने ज्ञानेश्वर मंदिर येथे फाल्गुन शुद्ध पंचमी सोमवार दि. 07 मार्च ते षष्टी मंगळवार 08 मार्च 2022 पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे व दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक कार्यक्रमात सोमवार- पहाटे 4.00 ते 06 वा. काकड आरती,सकाळी 8.30 ते 12 वा. व 2.00 ते 4.30 वा.पर्यंत ज्ञानेश्वर ग्रंथाचे 9 वा व 12 अध्यायाचे पारायण,सायं. 5.00 ते 6.00 वा. पर्यंत ह.भ.प. विठोबा मांडलुस्कर-वणी यांचे प्रवचन,6.00 ते 7.30 वा. नागोठणे पंचक्रोशी व विभागाचे हरिपाठ,रात्री 9.30 ते 11.30 वा. चणेरा येथील ह.भ.प. नित्यानंद मांडवकर यांचे कीर्तन त्यानंतर भजन व हरी जागर करण्यात आले॰. या धार्मिक कार्यक्रमात सकाळी चहा व अल्पोहार,सायंकाळी चहा, दुपारी व रात्री महाप्रसादाचे आयोजन करण्यात आली आहे. मंगळवार 08 मार्च रोजी ह.भ.प.नारायणदादा वाजे अलिबागकर यांचे काल्याचे किर्तन करण्यात आले. त्यानंतर मंदिरातून टाळ-मृदुंगाच्या तालात भजन कीर्तन करीत निघालेली दिंडी ग्रा.पं. कार्यालय, शिवाजी चौक,गांधी चौक मार्गे पुन्हा मंदिरात आणण्यात आली. शिवाजी चौकात सर्व वारकरी मंडळीने रिंगण करून केलेले भगवंताचे नामस्मरण व भजनाचा आनंदात केलेले पाऊल धारा व घालण्यात आलेल्या फुगड्या बघण्यासारखे होते. प्रत्येक घरांसमोर रांगोळी काढून व भक्ति भावाने पूजा करीत दिंडीचे स्वागत करण्यात येत होते. दिंडी मंदिरात आल्यानंतर महाप्रसादाने सप्ताहाची सांगता झाली. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष रतन हेंडे,उपाध्यक्ष संतोष इप्ते,सेक्रेटरी ऋषिकेश भोय यांच्यासह उदंड रावकर,विजय शहासने,मोरेश्वर नागोठणेकर,विशाल खंडागळे, किशोर नागोठणेकर,संतोष सकपाळ यांच्यासह सर्व सदस्य व शहरासह विभागातील वारकरी सांप्रदाय व भाविकांनी मेहनत घेतली.