मुलींनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे - डॉ. प्राजक्ता शहासने
भाएसो डिप्लोमा कॉलेजमध्ये जागतिक महिला दिनी केले प्रतिपादन
नागोठणे : महेंद्र माने
नागोठणे येथील भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मंगळवार 08 मार्च रोजी सोसायटीच्या उपाध्यक्षा संगीता जैन यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. प्राजक्ता शहासने,पी.एस.आय.नारायण चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी रिना जैन,पोलिस नाईक मयूरी पाटील,पोलिस हवालदार सारिका म्हात्रे, कॉलेजचे प्राचार्य प्रविण भारती, इंग्लिश मि. प्रिन्सिपल निलम शेलार यांच्यासह कॉलेजच्या एचओडी ज्योती पालवे,एचओडी अस्मिता पाटील, टिपीओ निशा जामकर व कॉलेजचे सर्व प्राध्यापिक,कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ.प्राजक्ता शहासने यांनी सांगितले की, आजच्या धकाधकीच्या जीवनातही मुली शिक्षणासह इतर वेगवेगळ्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवीत आहे. आपणही शिक्षणाबरोबर आपल्या आरोग्याकडेही लक्ष देणे जास्त गरजेचे आहे. आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित असेल तर आपण कोणत्याही क्षेत्रात पुढे जाऊ शकतो.तसेच आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची याची उदाहरणासहीत माहिती सांगून त्यासाठी लागणार्या होमियोपॅथीक औषधाचे असलेले फायदे शेवटी डॉ. शहासने यांनी सांगितले. नारायण चव्हाण यांनी महिला सक्षमीकरण पोलीस दल हे महिलांसाठी चोवीस तास उपलब्ध असून 112हा इमर्जन्सी नंबर असून त्याचा वापर कसा करायचा याची माहिती दिली. कॉलेजचे प्राचार्य श्री. प्रविण भारती यांनी समाजात मुलीदेखील मुलांप्रमाणेच सक्षम असून त्या महत्त्वपूर्ण पदांवर काम करु शकत असल्याचे सांगून निर्मला सीतारमण, चंदाकोचर, प्रतिभाताई पाटील यांसारख्या महिला उच्चपदस्थ पदांवर काम करत असल्याचे सांगितले. तसेच बीईस शाळेच्या प्रिन्सिपल यांनी पहिली इंजिनियर महिला कोण होती, महिला दिनाचा लोगो कोणता अशी माहिती दिली. या कार्यक्रम तसेच जागतिक महिला दिनाला कॉलेज संस्थापक/अध्यक्ष किशोर जैन, सीईओ कार्तिक जैन यांनी शुभेच्छा दिल्या.