मुरुड पंचायत समिती मध्ये ३४३ आदीवासी बालकांना पोषण पोटलीचे वाटप
रोहा : किरण मोरे
रायगड़ जिल्हाचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या निर्धारातून आदिवासी बांधवांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून केलेल्या सप्तसुत्री कार्यक्रमाचे प्रभावी अंमलबजावणी चा भाग म्हणून एकात्मिक बालविकास सेवा अंतर्गत अन्नदा - पोषण आणि विकास कृती संघटना तर्फे व स्वामीराज फाउंडेशनच्या माध्यमातून मुरुड तालुक्यातील विविध अंगणवाडी केंद्रातिल ६ महीने ते ६ वर्ष वयोगटातील आदीवासी कुपोषित बालकांना आरोग्याच्या द्रुष्टीने पौष्टीक आहाराचे वाटप मुरुड पंचायत समिती येथील कै. नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात मुरुड तहसीलदार- रोहन शिंदे यांच्या शुभ हस्ते५किलो च्या ३४३ पोषण पोटली चे आदीवासी बालकांना वाटप करण्यात आले.
यावेळी मुरुड तहसीलदार रोहन शिंदे, पंचायत समिती गटविकास अधिकारी सुभाष वाणी,bनायब तहसीलदार गोविंद कोटंबे, माजी उपसभापती पंचायत समिती चंद्रकांत मोहिते, पंचायत समिती विस्तार अधिकारी सांख्यिकी संजय शेडगे, बालविकास प्रकल्प अधिकारी प्रविण पाटील, अन्नदा चे दिपेश गावड़े, स्वामीराज फाउंडेशन चे अध्यक्ष जयेश माने,फाउंडेशन महिला सक्षमीकरण विभाग अध्यक्षा संजीवनी माने ,मनी वाईज सेंटर मॅनेजर सुप्रिया पाशीलकर, उपाध्यक्षा कविता कदम, शुभांगी कोतवाल, सुवर्णा चांदोरकर, राजु म्हशीलकर, सर्व आंगणवाडी सेविका व आदिवासी महिला उपस्थित होत्या.
मुरुड तहसीलदार- रोहन शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त म्हणाले की आपलं आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रत्येक मातांनी आपला घर व आपला परिसर स्वच्छ ठेवा स्वच्छता महत्त्वाची आहे. स्वच्छता नसेल तर त्याठिकाणी रोगराई पसरते. आजारपणं वाढते यांचा परिणाम आपल्या बालकांवर होते तरी स्वच्छता अंगी आणा फिट राहण्यासाठी मातांनी रोजचा रोज व वेळेत पुरेसा अन्न सेवन करा.पोठभर पाणी पिया जर तुम्ही पुरेसा अन्नसेवन न केल्यामुळे आवश्यक पोषक घटकांची कमतरता होते.यांचा परिणाम बालकांवर होवुन बालकं आजारी पडतात.तरी स्वतः हा व आपल्या बाळाच्या वाढीसाठी संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे. त्याबरोबर मुलांचे शिक्षण ही महत्त्वाचे आहे मातांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देऊन मुलांना रोजच्या रोज शाळेत पाठवावे जेणे करून मुलांचं या शिक्षाणातुन त्याचं भवितव्य ठरेल असे आवाहन मातांना मुरुड तहसीलदार रोहन शिंदे यांनी यावेळी केले. तसेच अन्नदा - पोषण आणि विकास कृती संघटनांचे स्वामीराज फाउंडेशन व अंगणवाडी महिला सक्षमीकरण यांचे यावेळी आभार मानले. बालकांचे आरोग्याच्या द्रुष्टीने कुपोषित बालकांना संबंधितांकडून पोषण अहाराचे वाटप करण्यात आल्याने पालक आदीवासी वर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात आले.