चणेरा येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तर्फे होम मिनिस्टर "खेळ पैठणीचा" कार्यक्रम संपन्न
चणेरा/रोहा : रोहित कडू
चणेरा येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी आयोजित होम मिनिस्टर "खेळ पैठणीचा" कार्यक्रम उत्साहात पार पाडला. परस्परांची सुख-दु:खांची देवाण घेवाण व्हावी. परंपरागत कलांची जोपासना व्हावी. भारतीय उदात्त मूल्ये पुढील पिढीत संक्रमीत व्हावीत. या हेतूने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून खासदार सुनिलजी तटकरे व मराठी सिनेमा अभिनेत्री फुलाला सुगंध मातीचा मालिका फेम ऐश्वर्या शेट्ये उपस्थित होत्या व श्री. नाना सपकाळ, श्री. मधुकर पाटील, सौ. शिनकर मॅडम, श्री. देविदास कंडणेकर, चणेरा ग्रामपंचायत सरपंच श्री. प्रसन्न शिनकर, शेडसई ग्रामपंचायत उपसरपंच सौ. प्राजक्ता कडू, श्री. धर्माजी कोळी, श्री. दिपक कडू, श्री. प्रकाश जाधव, सौ. दर्शन देविदास कंडणेकर आणि सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. महिलांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत त्यांच्यातील कलागुण सादर केले. प्रसंगी ऐश्वर्या शेट्ये यांनी उपस्थित महिलांसमवेत कार्यक्रमात सहभागी होत कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या कार्यक्रमासाठी पैठणी, सोन्याची नथ, चांदीचा नाणा हे पारितोषिक होते. तसेच ५००० पेक्षा जास्त चटईचे वाटप झाले.
होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या खेळामध्ये पैठणीच्या मानकरी ठरल्या त्या ग्रुप ग्रामपंचायत शेडसई च्या सौ. नम्रता परशुराम पाष्टे व सोन्याची नथ सौ. धनश्री धर्मेंद्र चिपळूणकर, तसेच चांदीचा नाणा चे मानकरी सौ. योगिता शशिकांत शिते या मानकारी ठरल्या.
आज प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. इतिहासात देखील नारी शक्तीची प्रचिती येते. संस्काराच्या जपणुकीसह महिलांनी हवे त्या क्षेत्रामध्ये प्रगती गाठण्यासाठी अंगी आत्मविश्वास बाळगणे महत्वाचे आहे आणि हाच आत्मविश्वास वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.