चणेरा विभागात शेकाप-शिवसेनेला 'जोर का झटका!'
शंभराहून अधिक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश
चणेरा/रोहा : रोहित कडू
चणेरा विभागातील शेडसई ग्रामपंचायत व धोंडखार गडबड ग्रामपंचायतील कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला. या परिसरात इतर पक्षाचे वर्चस्व मोडीत काढून झालेल्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाल्याचे दिसत आहे.
खासदार श्री. सुनिलजी तटकरे यांच्या उपस्थितीत व श्री. रामचंद्र सपकाळ, श्री. देविदास कंडणेक, श्री. मधुकर पाटील श्री. प्रकार जधाव, श्री. प्रसन्न शिनकर, श्री. धर्माजी कोळी, श्री दीपक कडू, सौ. दर्शना देवीदास कंडणेकर, सौ. प्राजक्ता कडू, श्री प्रसन्न घाग तसेच सर्व ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
आमदार श्री. अनिकेतभाई तटकरे आणि पालकमंत्री आदितीताई तटकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून १०० हून अधिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहिर प्रवेश केला.
यामध्ये ग्रामपंचायत धोंडखार गडबड येथील ७७ कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला. श्री. दिपकशेट म्हात्रे तसेच ग्रामपंचायत सदस्या सौ. ज्योती शांताराम मोरे, मनोज शिलकर, चेतन मोरे, शुभम म्हात्रे, मंगेश मोहिते, सुयोग शिलकर, भालचंद्र भगत, सनी म्हात्रे यांच्या समवेत शेकापचे ७७ कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला.
तसेच शेडसई ग्रा. पं. येथील श्री. दत्ताराम माळी, श्री.गोवर्धन माळी, श्री चंद्रकांत मुंगळे, सागर मुंगळे, अमित सतामकर, महेश म्हात्रे यांच्या समवेत शिवसेना कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्याचप्रमाणे शेकापच्या सौ. कविता सुनील पवार यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. पक्षातर्फे सर्वांचे स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.