शिवरामभाऊ शिंदे यांची संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, शाखा रोहा तर्फे सत्कार 

रोहा : समीर बामुगडे 

शिवरामभाऊ शिंदे यांची संजय गांधी निराधार  योजना समिती अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा रोहा तर्फे सत्कार कुणबी समाज नेते महाराष्ट्र राज्य उच्चधिकार समितीचे माजी अध्यक्ष शंकरराव म्हसकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रोहा ओबीसी अध्यक्ष कुणबी समाज नेते सुरेश मगर, रायगड जिल्हा समन्वय समिती चिटणीस शिवराम महाबळे, रोहातालुका कुणबी समाज उपध्याक्ष मारुती खाडेकर सर, रायगड जिल्हा कुणबी समाज युवक अध्यक्ष महेश बामुगडे, रोहा तालुका कुणबी युवक अध्यक्ष अनंत थिटे, दत्ताराम झोलगे, खेळू ढमाळ, पांडुरंग कडू, सुहास खरीवले, मगेश देवकर शशिकांत कडू, उपसरपंच संतोष माने यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य पदी करजे गुरुजी, सतिश भगत यांची निवड झाल्याबद्दल व नवनिर्वाचित तलाघर ग्रामपंचायत उपसरपंच संतोष माने यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळीं शंकरराव म्हसकर यानी मनोगत व्यक्त करताना शिवरामजी शिदे रोहा तालुक्याला या पदाच्या माद्यमातून योग्य न्याय देतील असा विश्वास वक्त केला तसेच त्याच्या पुढील सामजिक व राजकिय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सुरेश मगर यानी आपले मनोगत व्यक्त करताना शिवरामजी शिदे यानी रोहा तालुका कुणबी समाज एकसंघ ठेवण्यात खुप मोठा सिंहाचा वाटा आहे असे मत व्यक्त केले तर शिवराम शिदे यांनी सत्काराला उत्तर देताना रायगड चे खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या आशिर्वादाने या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे खऱ्या अर्थाने तालुक्यातील आर्थिक दुर्बल व निराधार माता भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी आमची समिती काम करेल  समाजातील सर्वच घटकांसाठी काम करण्यासाठी आम्ही प्रयन्शील राहून न्याय देण्याचे प्रमाणिक प्रयत्न करणार आहोत. 

लवकरच ज्या समाज बांधवाची शासकीय समितीचे सदस्य म्हणून निवड झाली आहे व नवराष्ट्र नवभारत आदर्श सरपंच म्हणून सन्माननित झालेले सरपंच, रायगड भुषण, विवीध कार्यकारी सोसायटी समिती चेअरमन व सदस्य समाज बांधवाचा सत्कार करण्यात येणार असल्याचे कुणबी समाज वतीने कळविण्यात आले आहे.

Popular posts from this blog