नागोठण्यातील अनेक तरुण कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश
महेंद्रशेठ घरत यांच्या कार्यकुशल नेतृत्वावर विश्वास ठेऊन केला प्रवेश
नागोठणे : महेंद्र माने
नागोठणे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या कार्यकुशल नेतृत्वावर विश्वास ठेऊन घरत यांच्या शेलघर येथील सुखःकर्ता या निवस्थानी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी रायगड जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, अल्पसंख्यांक अध्यक्ष आखलक शिलोत्री, काँग्रेसचे रायगड जिल्हा सरचिटणीस सद्दाम फर्मान दफेदार, जिल्हा सरचिटणीस अशोक मुंढे, खालापूर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कृष्णा पारंगे यांच्यासह सर्फराज हाफिज, रमीझ दफेदार, दानिश अधिकारी, सैफ दफेदार, मोहद्दीस अधिकारी, फझल दफेदार, अदनान अधिकारी, अफशान अधिकारी तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधीकारी व सदस्य उपस्थित होते.
काँग्रेस पक्षात रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष.पप्पु अधिकारी, जिल्हा परिषद गण अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष राजू कुरेशी, नागोठणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेल उपाध्यक्ष नसीम इलामी, नागोठणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेल युवा नेते असिफ कुदेकर,युवा नेते असिफ मुल्ला,असिफ कुवारे व फैय्याज पानसरे यांच्यासह नजीर सैयद,मुबशीर अधिकारी,असिफ कुवारे, ताबिश शेख,इरफान पानसरे,राजू घरटे, हनीफ पठाण,झुबेर पानसरे,सलमान पानसरे,आहद कडवेकर,सलमान शेख, फैसल सैयद, फैझान सैयद, साबीर पाटणकर,अम्मार पाटणकर,सगीर पानसरे, फहद गजगे, मूदसर चोगले,अरबाज फामे,अरबाज सैयद आदीने जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला असून या सर्वांचे काँग्रेस पक्षाची शाल व पुष्पगुच्छ देऊन काँग्रेस पक्षात स्वागत करण्यात आले.तसेच यावेळी काँग्रेस पक्ष सदैव आपल्या पाठीशी उभा राहणार असल्याची ग्वाही जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी दिली असल्याची माहिती सद्दाम दफेदार यांनी दिली.